अद्वितीय सूर, तालबद्ध रचना, रसिकांना आकर्षित करणारी गायकी…यामुळे पंजाबी संगीत लोकप्रिय (Best Punjabi Singer) आहे. हल्ली बऱ्याचशा चित्रपटात पंजाबी-हिंदी गाणे असते. गाण्याचे बोल समजत नसले तरीही प्रेक्षक या गाण्यांकडे सहज ओढले जातात. हेच या गाण्यांमागचे यश! आजच्या तरुण आणि विशेषत: टीन एजर्सना पंजाबी पॉप, हिप-होप, ढोल बीट्स आणि रॅप यांचे आज जे वेड आहे, त्याला कारण ८०च्या दशकात ‘गुरुदास मान’ यांच्या खड्या आवाजातील पंजाबी गाण्यांमुळे. अशा प्रकारे पाश्चात्त्य संगीताचा प्रभावसुद्धा पंजाबी संगीतावर आहे. बब्बू मान, सुरजीत बिंद्राखिया, दलेर मेहंदी, अमरिंदर गिल ….अशा इतर अनेक महान गायकांनी गाजवलेल्या… लाईव्ह संगीताची परंपरा असलेल्या गायकांची माहिती जाणून घेऊया.
पंजाबी गाणी अलीकडे तरुण मुले आणि लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. अनेक प्रतिभावान गायकांनी गायलेल्या गाण्यांमुळे ही गाणी रसिकांच्या लक्षात राहात आहे. विशेष म्हणजे या गाण्यांकडे रसिक प्रेक्षक आकर्षित होत आहेत. पंजाबी संगीत हे सर्वात लोकप्रिय प्रादेशिक संगीत असून त्याची हिंदी संगीताशी तुलना केली जाते.
गुरु रंधावा (Guru Randhawa)
गुरु रंधावा यांनी २०२१ मध्ये सर्वात लोकप्रिय पंजाबी गायकांसाठी दुसरे स्थान मिळवले. गुरु रंधावा हे गायक, गीतकार, अभिनेते आणि निर्माते आहेत. त्यांचा शांत आवाज आणि त्यांचे पंजाबी उच्चार पंजाबी संगीत जिवंत करतात. प्रेक्षकांना त्यांनी केलेले गीतलेखन कौशल्य आणि संगीत दिग्दर्शन आवडते. लाईव्ह संगीतात त्यांनी केलेल्या नृत्यामुळे प्रेक्षक भारावून जातात. त्यांच्या स्मित आणि गोड हास्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
हार्डी संधू (Hardy Sandhu)
हार्डी संधू हे हरदेविंदर सिंह संधू या नावानेही लोकप्रिय आहेत. भारतीय गायक, अभिनेता आणि माजी क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख आहे. ‘सोच’ आणि ‘जोकर’ या गाण्यांकडे त्यांनी रसिकांचे आश्चर्यकारकरित्या लक्ष वेधले. टकीला शॉट या गाण्यातून त्याने आपल्या गायन कारकिर्दिला सुरुवात केली. हार्डी हा उत्कृष्ट गायक आणि अभिनेता आहे. त्याच्या अभिनय कौशल्याबद्दल ‘यारान दा कच्छप “या चित्रपटासाठी त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे. हार्डीची काही गाणी सदाबहार हिट झाली आहेत. यामध्ये जोकर, बॅकबोन, हॉर्न ब्लो, यार ना मिलेया या गाण्यांचा समावेश आहे. त्याने २०१७ मध्ये नाह विथ ब्युटीफुल नोरा फतेही हे युगलगीत तयार केले. जे २०१७ या वर्षातील देशातील सर्वात मोठे हिट ठरले. ‘नाह’ आणि ‘क्या बात आये’ सारख्या त्यांच्या सर्वात यशस्वी गाण्यांमुळे तो राष्ट्रीय गायक बनला. आता तो २०२१ मधील पंजाबमधील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणूनही ओळखला जातो. तो जॅझ, पॉप, हिप हॉप, भारतीय आणि शास्त्रीय पंजाबी यासारख्या विविध शैलींची गाणी गातो. १९८३च्या विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेवर आधारित नुकत्याच आलेल्या ‘८३’ या चित्रपटाचाही तो एक भाग आहे. तो माजी क्रिकेटपटू असल्याने हा चित्रपट त्याच्यासाठी नक्कीच खास आहे.
दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)
दिलजीत दोसांझ प्रतिभावान तरुण गायक, अभिनेता आणि निर्माता आहे. त्याने पंजाबी तसेच हिंदी बॉलिवूड चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. त्याचे संगीत पंजाबी, भांगडा, पॉप आणि हिप-हॉप पार्टी गाण्यांसारख्या शैलींवर आधारित आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. उडता पंजाब, गुड न्यूज, होंसला रख आणि इतर अनेक चित्रपटांमुळे त्याला लोकप्रियता लाभली. त्याला सर्वोत्कृष्ट गायनातील पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सहजपणे प्रवेश करणारा तो पहिला पंजाबी गायक आहे. बिलबोर्डच्या ५० गायकांच्या यादीत दिलजीत दोसांझ अव्वल स्थानावर होता.
बब्बू मान (Babbu Maan)
बब्बू मान म्हणून ओळखला जाणारा तेजिंदर बब्बू मान हा एक लोकप्रिय भारतीय गीतकार, गायक, निर्माता, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. बब्बू मान यांनी 1997 मध्ये सज्जन रुमाल दे गया नावाचा त्यांचा पहिला अल्बम रेकॉर्ड केला. त्याच्या ध्वनिमुद्रिकांमधील बहुतेक गाणी सुधारित आणि पुन्हा प्रकाशित झाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या तू मेरी मिस इंडिया या अल्बममधून त्याने पदार्पण केले. 1999 पासून त्याने ८ स्टुडिओ अल्बम आणि ६ संकलन अल्बम, लिखित पटकथा आणि पंजाबी निर्मित चित्रपटांसाठी पटकथा प्रकाशित केल्या आहेत. प्रादेशिक आणि बॉलीवूड या दोन्ही चित्रपटांच्या ध्वनिमुद्रिकांमध्येही त्याने योगदान दिले आहे. बब्बू मान हे पंजाबमधील ‘वन होप, वन चांस’ नावाच्या ना-नफा संस्थेचे राजदूतदेखील आहेत. बब्बू मानची गाणी पॉप, लोकसंगीत, भांगडा आणि गझल यासारख्या शैलींवर आधारित आहेत.
हनी सिंग (Honey Singh)
यो यो हनी सिंग किंवा फक्त हनी सिंग या नावानेही ओळखला जातो. संगीतकार, पॉप गायक आणि अभिनेता हनी सिंगच्या गाण्यांचे एक युग आहे जिथे तरुणांना आणि मुलांना तो खूप आवडायचा. त्याच वर्षी त्याचे गाणे प्रचंड यशस्वी झाले. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ध्वनिमुद्रण कलाकार म्हणून केली. त्यानंतर भांगडा संगीतकार म्हणूनही त्यांना ओळख लाभली. त्यांनी लवकरच बॉलिवूड चित्रपटांसाठी संगीत तयार करण्यास सुरुवात केली. आजच्या काळात ते भारतीय संगीत उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community