Hair Colour Style For Men: व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसण्याकरिता पुरुषांनी केसांसाठी वापरावेत ‘हे’ आकर्षक रंग !

विविध रंगाच्या छटा केसांना देऊन व्यक्तिमत्त्व उठावदार करण्याकरिता पुरुषही जागरुक असतात, मात्र केस खराब होतील, अशी काळजी वाटते. केसांची योग्य ती काळजी घेतली तर व्यक्तिमत्त्व खुलून दिसायला मदत होऊ शकते.

323
Hair Colour Style For Men: व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसण्याकरिता वापरा केसांसाठी 'हे' आकर्षक रंग !
Hair Colour Style For Men: व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसण्याकरिता वापरा केसांसाठी 'हे' आकर्षक रंग !

मऊ, मुलायम केस हे सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. (Hair Colour Style For Men) चमकदार केसांमुळे चेहराही आकर्षक दिसतो. हल्ली केसांच्या आरोग्याबाबत फक्त महिलाच जागरुक असतात, असे नाही, तर पुरुषही केसांचे सौंदर्य वाढीस लागावे याकरिता हेअर आर्टिस्टचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतात. केस आकर्षक, चेहऱ्याला साजेसे दिसावेत याकरिता केसांना रंग दिला जातो. विविध रंगाच्या छटा केसांना देऊन व्यक्तिमत्त्व उठावदार करण्याकरिता पुरुषही जागरुक असतात, मात्र केस खराब होतील, अशी काळजी वाटते. केसांची योग्य ती काळजी घेतली तर व्यक्तिमत्त्व खुलून दिसायला मदत होऊ शकते. ‘हेअर हायलायटिंग’ आणि ‘कलरिंग करणे’ हा त्यापैकीच एक प्रकार आहे. अनेक तरुण मुले केसांना दाट रंग देण्याचा प्रयोग करतात, मात्र त्यांच्या त्वचेचा रंग आणि केसांचा प्रकाराला कोणता रंग साजेसा आहे, हे समजून घेतले जात नाही. याकरिता ‘या’ लेखाची तुम्हाला मदत होऊ शकते.

बहुतांश भारतीय पुरुषांच्या केसांचा रंग तपकिरी असतो. म्हणून केसांच्या रंगासाठी नेहमी बर्गंडी, सोनेरी आणि तपकिरी यासारख्या छटा विचारात घ्याव्यात. ज्यांच्या त्वचेचा रंग गोरा किंवा उजळ आहे. अशा तरुणांना केस हायलाईट करताना लाइट रंगाचा वापर करायचा. निळ्या किंवा जांभळ्या हलका रंग यासाठी वापरता येईल.

(हेही वाचा – Blast : मध्य प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; २५ जण ठार)

हेअर कलरिंग आणि हेअर हायलायटिंग केसांशी संबंधित या दोन वेगळ्या ब्यूटि ट्रिटमेंट आहेत. यामधील फरक पाहूया –

हेअर कलरिंग फॉर मेन (Hair Coloring for Men)
– संपूर्ण केसांना हेअर कलर केल्यामुळे सर्व केसांचा रंग बदलतो.
– संपूर्ण केसांना एकसमान रंग लावला जातो.
– एकसमान रंग राखण्यासाठी केस वाढतात म्हणून टच-अपची आवश्यकता असते.
-नैसर्गिक केसांच्या रंगाशी कृत्रिम रंग जुळल्यास नैसर्गिकरित्या चेहऱ्याला सौंदर्य प्राप्त होते.
– पुरुष शक्यतो काळा, तपकिरी, सोनेरी असे रंग वापरतात.
– योग्य प्रकारे केसांना रंग न दिल्यास किंवा रसायनांचा जास्त वापर केला तर केसांचे नुकसान होण्याचा धोका असतो.

हेअर हायलायटिंग फॉर मेन (Hair Highlighting for Men)
– ठराविकच केसांना हलके किंवा कॉण्ट्रास्ट रंग लावतात.
– टेक्सचर लुकसाठी विविध टोन किंवा स्ट्रीक्स वापरतात.
-सिलेक्टिव्ह अॅप्लिकेशन केसांच्या विशिष्ट भागांमध्ये फिकट निवड रंगांचा वापर करतात.
– मेटेंनन्समुळे केसांची वाढ होऊ शकते.
-तुम्ही निवडलेल्या कॉण्ट्रास्ट रंगांवर सूक्ष्म किंवा ठळक फरक अवलंबून असतो.
– कॉण्ट्रास्ट कलरसाठी बहुतेक फिकट छटांचा वापर केला जातो.
– स्ट्रेक्स, शेड्स, लाइटर शेड्स उदा, सोनेरी, कॅरेमलचा वापर याकरिता जास्त होतो.
-संपूर्ण केसांना रंग देण्याऐवजी विशिष्ट डोक्यावरील विशिष्ट केसांना रंग देऊन ते हायलाइट केले जातात.
– साधारणपणे हे ब्यूटि ट्रिटमेंट लोअर रिस्क समजली जाते.

भारतातील कोणत्याही त्वचेच्या टोनसाठी केसांचे रंग/हायलाइट्स

ब्राऊन शेड्स
बरेचसे पुरुष ब्राऊन शेड्स पसंत करतात. ही शेड्स चॉकलेटी, तपकिरी अशा विविधरंगी छटांमध्ये उपलब्ध आहे. तपकिरी रंगाची छटा भारतीय त्वचेवर सहजपणे मिसळू शकते. यामुळे केसांना नवा लूक मिळतो. विद्यार्थी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती यांच्या केसांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

बरगंडी रंगाच्या छटा
बरगंडी हा लाल-तपकिरी रंग आहे. तुमची त्वचा गोरी असो तपकिरी, बरगंडी केसांचा रंग भारतीय पुरुषांना छान दिसतो. केसांना कलरिंग आणि स्टाइलिंगचा प्रयोग करायला आवडत असेल, तर हा प्रयोग करून पाहू शकता. ही ब्यूटि ट्रिटमेंट फॅशन स्टेटमेंट वाढवायला मदत करते.

आइस ब्लॉण्ड
हा केसांचा सर्वात छान रंग समजला जातो. या केसांच्या रंगामध्ये केसांना फिकट गुलाबी सोनेरी करण्यासाठी ब्लिचिंग आणि इतर प्रक्रिया समाविष्ट आहे. यामध्ये मॅट फिनिशिंगही येते. निळा, व्हायलेट, हिरवा यासारखे रंग वापरून तुम्ही केस हायलाइट करू शकता.

बटररी ब्लोंड
बटररी ब्लोंड हा एक उबदार रंग असून त्यावर मध-पिवळ्या केसांचा रंग असतो. या रंगामुळे तुमचे केस जाड आणि मोठे दिसू शकतात. अशा रंगाच्या मॅट उपलब्ध आहेत. याशिवाय कधी कधी नवीन वाढलेल्या केसांच्या रेषा झाकण्यासाठी केसांची मुळे वाढू लागल्यानंतर केसांना पुन्हा नवीन रंग लावण्याची आवश्यकता असते.

प्लॅटिनम ब्लोंड
हा एक ब्लॉकबस्टर रंग आहे. काळ्या आणि सोनेरी रंगाचे मिश्रण असते. यामुळे केस उठावदार दिसू शकतात.

टाइप्स ऑफ हेअर कलर्स फॉर मेन्स (Types of Hair Colours For men)
कायमस्वरुपी हेअर कलर, सेमी परमनंट हेअर कलर, टेम्पररी हेअर कलर, अशा केसांना रंग लावण्याच्या विविध पद्धती आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.