Om Certificate – ओम प्रमाणपत्राची सुरुवात वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. यानिमित्ताने अनेक व्यावसायिकांची आपण नोंदणी करून घेत आहोत, मग त्यात विक्रेता असतील, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा प्लम्बर, इलेक्ट्रिशियन असो त्यांना आपण ओम प्रमाणित करत आहोत. पण आता हिंदू (Hindu) ग्राहकांनाही जागृत करण्यासाठी हिंदू ग्राहक जागृती अभियान सुरु केले आहे. या माध्यमातून हिंदू ग्राहकांची नोंदणी (Registration of Hindu Customers) होऊन हिंदू ग्राहकांचा प्रचंड मोठा डेटाबेस तयार होणार आहे. याचा उपयोग हिंदू व्यावसायिकांना होणार आहे. एखाद्या भागात किती हिंदू (Hindu) ग्राहक आहेत याची माहिती संबंधित हिंदू व्यावसायिकांना (Hindu businessmen) होऊन त्यादृष्टीने त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना लाभ होईल, त्यादृष्टीने या हिंदू ग्राहक जागृती अभियानाची (Hindu Consumer Awareness Campaign) सुरुवात गुढीपाडव्यापासून डोंबिवली येथून करण्यात आली आहे. असाच शुभारंभ नाशिक आणि पुणे येथे होत आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी सांगितले. (Om Certificate)
Join Our WhatsApp CommunityHome एक्सक्लुसिव्ह हिंदूंना धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ग्राहक जागृती अभियान – मंजिरी मराठे Om...