कोरोनाकाळात देवस्थानांची होतेय ‘कृपा’! 

सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत राज्याची आरोग्यव्यवस्था कोलमडते कि काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी राज्यभरातील हिंदूंची देवस्थाने सरकारच्या मदतीला धावून आली आहेत. देव कुठे आहे, असे म्हणणाऱ्या महाभागांना या देवस्थानांनी चपराक दिली आहे. 

203

मागील वर्षभरापासूनचा काळ भारतीयांसाठी अत्यंत कसोटीचा आहे. सर्व राज्यांत कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही, तोच आता दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरुवात केली आहे. गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहणाऱ्या या महामारीने जीवन आणि मृत्यू यातील अंतरच जणू नष्ट केले आहे. तरुण असो कि वयस्क सगळ्यांना मृत्यूचा आरसा दाखवणाऱ्या या महामारीने आता ‘परस्परामंधील वैर विसरून गोडीगुलाबीने राहू, किती दिवस असू माहित नाही’, अशा मनस्थितीत मानवजातीला आणून ठेवले आहे. सर्वत्र हाहाकार सुरु आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. मात्र याही परिस्थिती मंदिरातील देव मात्र मानवाच्या रक्षणासाठी धावून येत आहेत. ‘एवढी मोठी महामारी आली आहे, देव कुठे आहेत’, असे म्हणणारे महाभाग आजच्या परिस्थितीतही दिसतात, पण मानवाच्या कर्माने हे त्याच्या वाट्याला भोग आले आहेत, त्याला देव तरी काय करणार, हे मात्र ते महाभाग विसरतात. तरीही देव कृपाळू असतो म्हणूनच भक्तांनी श्रद्धेने अपर्ण केलेले धन देवस्थाने पुन्हा भक्तांनाच कोरोना काळात विविधी आरोग्यसुविधा उपलब्ध करून परत करत आहेत.

श्री गजाजन महाराज देवस्थानाची मदत!

५०० खाटांचे कोविड सेंटर 

शेगावस्थित श्री गजाजन महाराज देवस्थान या खासगी देवस्थानाने सध्याच्या कोरोनाच्या काळात सरकाराला मदतीचा हात दिला आहे. संस्थानाने बुलढाणा जिल्ह्यासाठी ५०० खाटांचे सुसज्य असे कोविड सेंटर उभे केले आहे. ज्यामध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याची सोय आहे. त्यात रुग्णांना जेवणही दिले जाते. दररोज स्वच्छता केली जाते. मुळातच सेवाभावी वृत्तीने हे सेंटर चालवले जात असल्याने याचा एक पैशाचा आर्थिक भुर्दंड रुग्णावर नसतो, सगळा खर्च देवस्थान करत आहे.

New Project 1 12

२ हजार जणांना मोफत अन्नदान 

कोरोनामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे हातावर पोट आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गोरगरीब मजुरांसाठी देवस्थानाने कम्युनिटी किचन संकल्पना सुरु केली आहे. त्याअंतर्गत तब्बल २ हजार जणांना दररोज अन्नदान केले आहे आहे. देवस्थान अशा प्रक्रारे गोरगरीबांची पोटे भरण्याचे काम करत आहे.

(हेही वाचा : १० उच्च न्यायालयांत व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे कशी होते सुनावणी? वाचा…  )

तुळजाभवानी देवस्थानाचा पुढाकार!

३०० खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय 

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून तुळजाभवानी देवस्थानाची  ओळख आहे. कोरोना काळात सध्याच्या भीषण संकटात याही देवस्थानाने पुढाकार घेतला आहे. या देवस्थानाने त्यांच्या मालकीच्या ठिकठिकाणी धर्मशाळा आहेत. तिथे वीज आणि पाण्याची उत्तम सोय आहे. त्याठिकाणी ३०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारणार आहे. त्यातील १५० खाटा ह्या ऑक्सिजनच्या असणार आहेत. यातील सध्या ५० खाटा सुसज्ज करण्यात आल्या आहेत. १०० खाटांचे काम प्रगतीपथावर आहे.

New Project 3 12

देवस्थान या ठिकाणी कोविड रुग्णालय उभारण्याचे काम करत आहे, मात्र त्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे खासगी डॉक्टर आणि नर्सने यासाठी मदत करावी.
– कौस्तुभ दिवेगावकर, अध्यक्ष – तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

श्री साई शिर्डी संस्थानचे सहाय्य!

ऑक्सिजन प्लांट आणि आरटीसीपीआर लॅब उभारणार

श्री साई शिर्डी संस्थान ही वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्याने सध्या अत्यंत तुटवडा निर्माण झालेल्या ऑक्सिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट लॅब उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे संस्थान येत्या १० दिवसांत ऑक्सिजन प्लांट आणि आरटीपीसीआर लॅब उभी करणार आहे. तसा प्रस्तावही मंजूर झाला आहेत. लॅब उभी करण्यासाठी एम्स सोबत चर्चाही सुरु झाली आहे.

New Project 4 12

रेमडेसिवीर इंजेक्शनचा २ दिवसांत पुरवठा! 

त्याचबरोबर सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे संस्थानने याबाबत केंद्र शासनाशी चर्चा करून पुरवठादारांना आहे. येत्या २ दिवसांत या इंजेक्शनचा पुरवठा संस्थान करणार आहे.

सध्या साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालय चालवले जात आहे. शासनाच्या आदेशानुसार आणि दिशानिर्देशानुसार या रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर तसेच कोविड डेडीकेटेड हॉस्पिटल उभारण्यात येत आहे.
– काहुराज बगाटे, भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी.

(हेही वाचा : कोरोना काळात फुफ्फुसाचे आरोग्य तपासण्यासाठी अशी करा चाचणी…)

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अर्थसहाय्य!

कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी देवस्थानाने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पश्चिम महाराष्ट्र  देवस्थानने सढळ हस्ते मदत केली आहे. मुख्यमंत्री निधीला डिड कोटी रुपये मदत केली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १ कोटी, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये दिले. या व्यतिरिक्त रिक्षाचालक, घरेलू कामगार, नाभिक समाज, वारांगना, तृतीयपंथीय आणि फेरीवाले अशा गरीब घटकांना २ महिन्यांचे रेशन मोफत पुरवले. तर ज्योतिबा देवस्थानाने ४०० गोरगरीब कुटुंबाना २ महिन्याचे रेशन मोफत पुरवले.

maxresdefault 10

श्री सिद्धिविनायक मंदिराची आर्थिक मदत! 

श्री सिद्धिविनाय मंदिरानेही कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. लॉकडाऊन लावल्याने गोरगरीब कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी अशा गरजूंना देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्री सहाय्य निधीला ५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.