लॉकडाऊनच्या तीन महिन्यात वाढीव बिले आल्याने सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले असून, आता यावरून भाजपा माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महावितरण चालवण्यासाठी राज्याला 20 हजार कोटी रुपयांची गरज होती. ते उभे करण्यासाठी मंत्रालयात एक कट शिजला आणि राज्यातील वीज ग्राहकाला त्यांनी वाढीव बिलं पाठवली असे सोमय्या म्हणालेत.
काय म्हणालेत किरिट सोमय्या
आम्ही राज्यातील 20 ठिकाणांहुन प्रातिनिधिक स्वरूपात 100 बिले एक नमूना म्हणून आणली आहेत. या वीजबिलांचा आम्ही बारीक अभ्यासही केलाय. लॉकडाऊनमध्ये वीजदर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी 20 टाके वाढवले आहे. राज्य सरकार लोकांची दिशाभूल करुन लूट करत आहेत. हे सरकार लोकांना मूर्ख बनवत आहे. सरासरी बिलं द्यायची हा या सरकारचा घोषित केलेला निर्णय होता. मात्र, प्रत्येक्षात वेगळेच आहे. 3 ते 10 पट बिलं काढली आहेत. हे हप्ते खाऊ सरकार लोकांना हप्त्याने बिल भरा म्हणते,असं किरीट सोमय्या म्हणाले.
महावितरण चालवायला सरकारकडे पैसे नाहीत
महावितरणकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, वीज खरेदी करायला पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी असं कारस्थान रचले. राज्यात 1 लाख ग्राहकांना अशी बिले पाठवलीत. जिथं बिल दुप्पट पेक्षा जास्त आहेत. अश्या 40 हजार तक्रारी आल्या आहेत. आम्ही हजारो बिले जमा केली आहेत. ही बिलं राज्यपाल यांना पाठवणार आहे. महावितरण सोबत बेस्ट, अदानी, टाटा यांनी पण जर वाढीव बिल पाठवली असतील तर त्यांनाही जाब विचारणार असल्याचे सोमय्या म्हणाले. महावितरणने अशी बिलं का पाठवली? असा प्रश्न करत जुलै मधील बिलं मागे घेण्याची मागणी केलीय. मात्र, ही बिलं मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारचा नाही. राज्य सरकारने परत जुलै महिन्यात आलेली बिले मागे घ्यावीत, अशी मागणी आम्ही केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community