Rajiv Gandhi International Cricket Stadium : हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमच्या उभारणीची रंजक कहाणी

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी या स्टेडिअमची उभारणी झाली होती. 

224
Rajiv Gandhi International Cricket Stadium : हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमच्या उभारणीची रंजक कहाणी
  • ऋजुता लुकतुके

हैद्राबादने भारतीय क्रिकेटला जयसिंहा, अझरुद्दिन, व्ही व्ही एस लक्ष्मण पासून ते आताच्या काळात मोहम्मद सिराज सारखे खेळाडू दिले आहेत. या सगळ्यांची जडण धडण झाली ती गावातील फत्तेचंद क्रिकेट मैदानात. पण, हे मैदान छोटं आणि गावात असल्यामुळे विस्तारावर निर्बंध असलेलं होतं. म्हणूनच २०११ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार म्हटल्यावर देशातील प्रमुख स्टेडिअमची पुनर्बांधणी आणि नवीन स्टेडिअमच्या उभारणीची गरज भासू लागली. शिवाय फत्ते मैदानावर वसलेलं लाल बहादूर शास्त्री क्रिकेट स्टेडिअमवर क्रीडा प्राधिकरणाचा अधिकार होता. त्यामुळे हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनला त्यांचं हक्काचं स्टेडिअम हवं होतं. (Rajiv Gandhi International Cricket Stadium)

२००३ मध्ये हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारकडे नवीन स्टेडिअमच्या उभारणीचा प्रस्ताव ठेवला. तेव्हाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्वरेनं हा प्रस्ताव संमतही केला. आणि जागा निश्चित करण्यात आली ती हैद्राबाद शहराच्या उत्तरेला असलेल्या उप्पल या उपनगरातील जागा. स्टेडिअमच्या नामकरणासाठीच खुला लिलाव करण्यात आला. आणि यात विशाका इंडस्ट्रीज लिमिटेडने बाजी मारली. त्यांची बोली होती ६,५०० लाख रुपयांची. हाच निधी स्टेडिअमच्या उभारणीसाठी वापरला जाणार होता. यातले ४,५०० लाख रुपये विशाखा कंपनीने आगाऊ दिले. आणि बांधकाम सुरूही झालं. (Rajiv Gandhi International Cricket Stadium)

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात इतका झटपट निधी जमा होऊन स्टेडिअमच्या उभारणीचं कामही दोन वर्षांत पूर्ण करण्याची तत्परता एखाद्या सरकारी यंत्रणेनं पहिल्यांदाच दाखवली असेल. कारण, २००५ मध्ये स्टेडिअम जवळ जवळ उभारून तयार होतं. याचवर्षी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिके दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना इथेच व्हावा अशीही तयारी सुरू झाली. पण, तेव्हाचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी (हेच पुढे तेलंगाणाचे मुख्यमंत्री झाले) यांना स्टेडिअमचं नाव राजीव गांधी यांना समर्पित असावं असं वाटत होतं. विशाका इंडस्ट्रीजबरोबर त्या दृष्टीने वाटाघाटी झाल्या. (Rajiv Gandhi International Cricket Stadium)

(हेही वाचा – JCB Pattern : नेत्यांच्या स्वागताचा “जेसीबी पॅटर्न”)

फलंदाजांना धार्जिणी अशी इथली खेळपट्टी

आणि ४,३०० लाख रुपये इतकं कंत्राटी मूल्य भरून स्टेडिअमच्या नामकरणाचा हक्कं मिळवला. आणि स्टेडिअमचं नामकरण झालं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम. स्टेडिअमच्या नॉर्थ एंडला पुढे हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनने व्ही व्ही एस लक्ष्मणचं नाव दिलं. हैद्राबाद पुरुषांचा आणि महिला संघ तसंच आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचं हे घरचं मैदान आहे. २०१० मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडचा कसोटी सामना हा इथं झालेला पहिला कसोटी सामना होता. तर अलीकडे इंग्लंड संघ दौऱ्यातील आपला पहिला कसोटी सामना इथंच खेळला होता. एकदिवसीय क्रिकेट मात्र २००५ पासून इथं सुरू आहे. (Rajiv Gandhi International Cricket Stadium)

शुभमन गिलने २०२३ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध इथं २०८ धावांची खेळी केली होती. ती या मैदानावरील एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने २०१० च्या कसोटीत २२५ धावा केल्या होत्या. थोडक्यात, फलंदाजांना धार्जिणी अशी इथली खेळपट्टी आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी इथं १२० कोटी रुपयांचं नुतनीकरणाचं काम करण्यात आलं. यात स्टेडिअममधील खुर्च्या बदलणे, स्टँडवर छप्पर बसवणं अशी कामं करण्यात आली. (Rajiv Gandhi International Cricket Stadium)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.