Waqf Amendment Bill : वक्फ बोर्डाकडे 2009 पर्यंत 4 लाख एकर जमीन होती, जी काही वर्षांमध्ये जवळपास दुप्पट झाली. 2023 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण 8 लाख 65 हजार 644 स्थावर मालमत्ता होत्या. म्हणजेच सध्या वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीत मदरसे, मशिदी आणि कब्रस्तान आहेत. रेल्वे आणि कॅथोलिक चर्चनंतर, वक्फ बोर्ड हे देशातील जमिनीचे तिसरे सर्वात मोठे मालक आहे. (Waqf Amendment Bill)
Join Our WhatsApp Community