हेन्री रॉयस (Henry Royce) यांचा जन्म २७ मार्च १८६३ साली पिटरबरो जवळच्या अल्वाल्टन हंटिंगडंशायर येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव जेम्स रॉयस आणि आईचं नाव मेरी रॉयस असं होतं. त्यांचे वडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पिठाची गिरणी चालवायचे, पण हा व्यवसाय फार काळ टिकला नाही. म्हणून त्यांचं कुटुंब लंडनला स्थायिक झालं.
१९७२ साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी शिक्षण सोडून वृत्तपत्रे विकणे आणि टेलिग्राम घरोघरी पोहोचवणे अशी कामं करावी लागली. १९८४ साली त्यांनी आपल्या एका मित्रासोबत रॉयस अँड कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीद्वारे ते लोकांच्या घरचे इलेक्ट्रिकल वायरिंगचं काम करून देत असत. १९९४ सालापर्यंत त्यांच्या कंपनीने डायनेमो आणि इलेक्ट्रिकल क्रेन बनवायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचं लिमिटेड कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि मोठा कारखाना सुरू केला.
(हेही वाचा – Arvind Kejriwal: केजरीवाल यांना अटक-रिमांडसाठी हायकोर्टाकडून दिलासा नाही, पदावरून हटवण्याच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी )
नवे उत्पादन तयार करण्याचा विचार…
दुसऱ्या बोअर युद्धानंतर जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स अमेरिका यांच्यात प्रतिस्पर्धा वाढली. त्यांच्याकडून डायनेमो आणि क्रेनच्या मागण्या सतत वाढत होत्या. तेव्हा हेन्री रॉयस यांनी नवे उत्पादन तयार करण्याचा विचार केला. त्यांनी मोटार कार बनवण्याचं ठरवलं आणि ती १९०४ साली बनवलीही. तशाच प्रकारच्या आणखी दोन कार बनवल्या. त्यामध्ये सिलेंडर इंजिन होतं. त्यांची एक कार एडमन्स चार्ल्स नावाच्या व्यक्तीने खरेदी केली. ते रोल्स यांचे मित्र होते. चार्ल्स हे रॉयस यांच्या कामाने खूप प्रभावित झाले. त्यांनी रॉयस यांची ओळख रोल्स यांच्याशी करून दिली. त्यानंतर रोल्स-रॉयस एकत्रितपणे काम करून गाड्यांची निर्मिती करायला लागले.