अंगदुखी, मुका मार, शरीराच्या एखाद्या भागावर आलेली सूज अशा विविध प्रकारच्या शारीरिक दुखण्यावर घरी असलेली ‘गरम पाण्याची पिशवी’ ( Hot Water Bag) आधार वाटते. पाणी गरम करून पिशवीत भरून शेकवलं की, खूप बरं वाटतं. शरीराला आराम मिळतो. रबराची असलेली ही पिशवी अनेक जणांच्या घरी असते, पण ती सुरक्षितपणे कशी वापरायची, याविषयी प्रत्येकाला माहिती असेलच असे नाही. योगरित्या या पिशवीचा वापर न केल्यास नुकसान होऊ शकते. याकरिता जाणून घेऊया ‘गरम पाण्याची पिशवी’ योग्यरित्या वापरण्याची पद्धत –
– पिशवीत ओतला जाणारा द्रव पदार्थ हे पाणी आहे. पाणी अतिशय उकळते नसावे, कारण पिशवी गळू शकते. अचानक शेकवताना पिशवी गळू लागल्यास शरीलाला इजा होऊ शकते.
– स्त्रियांसाठी, मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्याचे हे उपयुक्त साधन आहे. अशावेळी शेकवताना उकळलेले गरम पाणी पिशवीत ओतू नये. त्याऐवजी पाणी उकळण्याआधीच पिशवीत ओतावे.
(हेही वाचा – पोलीस अधिकारी बनला शाहीर; PSI Praveen Phanse यांनी लिहिला पोवाडा )
गरम पाण्याच्या पिशवीचे फायदे ?
हिवाळ्यात गरम पाण्याची पिशवी (Hot Water Bag) हे एक उपयुक्त साधन आहे. रबराच्या पिशवीने शेकवल्यास शरीरातील उष्णता टिकून राहते. पिशवीचा संपर्क शरीराशी आल्यामुळे रक्तवाहिन्या उघडायला मदत होते. शरीराच्या शेकवलेल्या भागावर रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते. स्नायूंना, हाडांना शेक मिळतो. शरीरात उबदारपणा येतो. वेदना कमी होण्यासाठी सांध्यासाठी आवश्यक असणारे अॅसिड शरीरात तयार होण्यास मदत होते.
कोणत्या कारणासाठी गरम पाण्याची पिशवी वापराल?
१. पाठदुखीपासून आराम मिळतो.
२. पोटदुखीवर उपचार करते.
३. मानदुखीवर उपचार करते.
४. तणाव आणि चिंतांपासून आराम देते.
५. मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून आराम मिळतो.
६. पचनास मदत होते.
गरम पाण्याची पिशवी सुरक्षितपणे वापरण्यासाठी काही टिप्स –
१. बाटली किंवा पिशवी नेहमी सरळ धरा.
२. बाटली भरताना किंवा गरम पाणी ओतण्याआधी अतिरिक्त हवा बाहेर काढा.
३. पिशवी उघडा आणि दोन तृतीयांश क्षमतेपर्यंत गरम पाणी भरा, काठोकाठ कधीही भरू नका.
४. लीक तपासण्यासाठी पाणी ओतल्यानंतर पिशवी उलट करून बघा म्हणजे वरच्या बाजूला धरून तपासा.
५. पिशवी शरीरात जिथे दुखत असेल तिथे ठेवा
६. शेकवून झाल्यानंतर पिशवीत पाणी तसेच न ठेवता ते ओतून टाका आणि ती उलटी लटकवून ठेवा. जेणेकरून ती आतून कोरडी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community