तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’

चला बघूया, आपल्याकडे असलेल्या नाण्यांचं जन्मस्थान कोणतं...

361

आपल्या खिशात छनछन वाजणारी नाणी म्हणजे चलनाचं सर्वात छोटं रूप. पण या नाण्यांची खरी ‘किंमत’ सुट्ट्यांचे वांदे झाल्यावर आपल्याला कळते. त्यामुळे 1 चं असो किंवा 20 चं, नाण्याला कधी हलक्यात नाही घ्यायचं.

Coin

(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)

आता ही नाणी आपल्या देशात जिथे बनतात त्या जागेला टाकसाळ म्हणतात. भारतात एकूण चार ठिकाणी अशी टाकसाळ आहेत, जिथली नाणी एकदम खणखणीत वाजतात. ती ठिकाणं म्हणजे मुंबई, नोएडा, हैद्राबाद आणि कोलकाता. आपल्याकडे असलेली नाणी या चारपैकी कुठे तयार झाली आहेत, हे आपल्याला सहज ओळखता येतं. चला बघूया, आपल्याकडे असलेल्या नाण्यांचं जन्मस्थान कोणतं…

coin 1

(हेही वाचा: 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)

काही नाण्यांवर जिथे नाणं तयार झाल्याचं वर्ष लिहिलेलं असतं, त्याच्या बरोबर खाली तुम्हाला एक खूण दिसेल, तर काही नाण्यांवर तुम्हाला ती दिसणार नाही. यावरूनच नाणं कुठे तयार झालंय हे आपल्याला समजतं.

‘♦’, ‘B’, ‘M’ खूण असलेलं नाणं

यापैकी कुठलीही एक खूण असलेली नाणी ही मुंबईच्या टाकसाळेत तयार झालेली आहेत. 1829 साली मुंबईतलं हे टाकसाळ फोर्टला स्थापन झालं आहे.

coin 1 1

(हेही वाचा: ‘ही’ आहे इंग्रजांच्या काळातली भारताची पहिली ‘आत्मनिर्भर’ बँक)

‘•’ खूण असलेलं नाणं

ज्या नाण्यावर ही खूण असेल ते नाणं नोएडाच्या टाकसाळेत बनवण्यात आलं आहे. या टाकसाळेची स्थापना 1988 साली झाली. स्वातंत्र्यानंतर भारतात स्थापन झालेलं हे एकमेव टाकसाळ आहे.

coin 2

‘★’ खूण असलेलं नाणं

अशी खूण असलेलं नाणं हे हैद्राबादच्या टाकसाळेत पाडण्यात आलं आहे. 1803 साली निजामाच्या हैद्राबाद संस्थानात हे टाकसाळ स्थापन झालं. भारताने निजाम संस्थानाचा ताबा घेतल्यानंतर 1950 साली यावर भारत सरकारची मालकी आली. 1997 नंतर हे टाकसाळ हैद्राबाद येथील सैफाबाद आणि चेरलापल्ली येथे हलवण्यात आलं आहे.

coin 3

(हेही वाचा: रेपो रेट वाढला की सर्वसामांन्यांची कर्ज का महागतात? वाचा सोप्या शब्दांत)

कुठलीही खूण नसलेलं नाणं

ज्या नाण्यावर कुठलीही खूण नाही, ते नाणं सुद्धा असली सिक्काच आहे मित्रांनो. अशी नाणी ही कोलकात्याच्या टाकसाळेत तयार केली जातात. 1757 साली कोलकात्यात भारतातलं पहिलं टाकसाळ स्थापन झालं होतं. कोलकात्यातील अलीपूर येथील टाकसाळ हे आजही सुरू आहे.

coin 4

2006 साली भारत सरकारने SPMCIL(Security Printing & Minting Corporation of India Ltd.) ही कंपनी स्थापन करुन या सर्व टाकसाळींची मालकी या कंपनीकडे सोपवली आहे.

(हेही वाचा: राज ठाकरेंच्या दाव्याला पुष्टी, मशिदींवरील भोंग्यांबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी)

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा आणि ही लिंक तुमच्या मित्रांना शेअर करुन, त्यांना त्यांच्याकडची नाणी ओळखायला मदत करा. कारण, ‘हर पैसा बोलता है, बस हमे सुनने आना चाहिए’ 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.