Chitra Wagh ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतार… दिशा सालियान प्रकरणावरुन गुरुवार सभागृहात चांगलाच वादंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियान प्रकरणावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष केलं जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजुने मैदानात उतरले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, त्यांनी आमदार चित्रा वाघ (MLA Chitra Wagh) यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळाल्या. (Chitra Wagh)