Indulal Yagnik: जर्मनीतून भारतीय तिरंगा लपतछपत सुखरुप भारतात आणणारे इंदू चाचा कोण होते?

इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.ए. आणि एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली. याज्ञिक १९५७ मध्ये अहमदाबाद मतदारसंघातून दुसऱ्या लोकसभेवर निवडून आले होते.

237
Indulal Yagnik: जर्मनीतून भारतीय तिरंगा लपतछपत सुखरुप भारतात आणणारे इंदू चाचा कोण होते?
Indulal Yagnik: जर्मनीतून भारतीय तिरंगा लपतछपत सुखरुप भारतात आणणारे इंदू चाचा कोण होते?

इंदुलाल याज्ञिक यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८९२ रोजी गुजरातमध्ये नागर ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील कनय्यालाल यांचे निधन इंदुलाल लहान असतानाच झाले. याज्ञिक यांनी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नडियादमध्ये पूर्ण केले आणि १९०६ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील शिक्षणासाठी ते अहमदाबादमधील गुजरात कॉलेजमध्ये दाखल झाले.

मग इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.ए. आणि एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली. याज्ञिक १९५७ मध्ये अहमदाबाद मतदारसंघातून दुसऱ्या लोकसभेवर निवडून आले होते. त्याच मतदारसंघातून १९६२ ते १९७२ या काळात ते तिसऱ्या, चौथ्या आणि ५व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले होते. ते भारतीय क्रांतिकारक, राजकीय नेते आणि साहित्यिक होते. त्यांना सगळे आदराने इंदू चाचा म्हणायचे.

(हेही वाचा – Kalyan Station : कल्याण रेल्वे स्थानकात सापडले स्फोटके, घातपाताचा धोका टळला)

त्यांनी नाटके, कविता, चरित्रे, आत्मचरित्र आणि इतर पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर १९२० पासूनच ते चित्रपटसृष्टीशी जोडले गेले. त्यांनी गुजराती चित्रपटांसाठी पटकथा देखील लिहिल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी मोठे योगदान दिले आहे. याज्ञिक यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथून तिरंगा ध्वज भारतात लपतछपत सुखरुप आणला होता. हा तिरंगा मादाम कामा यांनी फडकवला होता. अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सहभाग त्यात होता.

१९१५ मध्ये, जमनादास द्वारकादास आणि शंकरलाल बनकर यांच्यासमवेत त्यांनी मुंबईतून यंग इंडिया हे इंग्रजी भाषेचे मासिक प्रकाशित केले होते. साहित्यिक क्षेत्रात योगदान देत असताना स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. १९३६ मध्ये त्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या स्थापनेत सक्रिय पुढाकार घेतला. तसेच १९३९ मध्ये त्यांनी गुजरात किसान परिषदेची स्थापना केली. १९४२ मध्ये त्यांनी अखिल हिंद किसान सभेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी १९४३ मध्ये नूतन गुजरात हे गुजराती दैनिक सुरू केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.