International Mountain Day: आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

    सह्याद्रीच्या कड्यांना तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

    646
    International Mountain Day: आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
    International Mountain Day: आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

    दरवर्षी ११ डिसेंबर रोजी इंटरनॅशनल माऊंटेन डे (International Mountain Day) म्हणजेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो. लोकांना पर्वत संवर्धनाबद्दल जागरूक करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जंगलांचा ऱ्हास, सतत डोंगर पोखरणे यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्वत दिनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधला जाऊ शकतो.

    भारताला पर्वतांचा देश म्हटले जाते. बर्फाच्छादित हिमालयापासून ते हिरवे-हिरवेगार पर्वत येथे आहेत. महाराष्ट्र देखील पर्वतांचे राज्य. इथल्या सह्याद्रीच्या कड्यांना तर ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. छत्रपतींच्या पावन स्पर्शाने इथले पर्वत पवित्र झाले आहेत. त्याचबरोबर डोंगर म्हणजे प्राणी व पक्ष्यांचे निवासस्थान. त्यामुळे पर्वतांचे संवर्धन झालेच पाहिजे.

    (हेही वाचा – Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या…)

    युनायटेड नेशन्सच्या वेबसाइटनुसार, जगातील १५% लोकसंख्या पर्वतांमध्ये राहते आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे उद्दिष्ट पर्वतांचे संवर्धन आणि त्यांच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरुकता वाढवणे आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवसाची सुरुवात १९९२ मध्ये सुरू झाली.

    संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत याची घोषणा करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभेने २००२ हे पर्वतांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर ११ डिसेंबर २००३ पासून आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जाऊ लागला. Restoring mountain ecosystem ही २०२३ ची थीम आहे.

    हेही पहा – 

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.