भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे (Borivali) ‘इतिहास कट्टा’ या कार्यक्रमांतर्गत मराठ्यांच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व महाराणी येसूबाई. यांच्या संयमी, सहनशील आणि महापतिव्रती स्वराज्यनायिकेचा आयुष्यपट इतिहास अभ्यासक डॉ. रमिला गायकवाड ‘गोष्ट तिसरी : श्रीसखी राज्ञी जयति – महाराणी येसूबाई’ या कार्यक्रमांतर्गत या उलगडणार आहेत.
‘श्री सखी राज्ञी जयति’, असा ज्यांचा उल्लेख केला जातो. शिवछत्रपतींची सून आणि शंभूछत्रपतींची पत्नी म्हणून भाग्यवंत ठरलेल्या येसूबाई यांचे संपूर्ण जीवनचरित्र संघर्षाने आणि चढउताराने भरून गेले आहे. शिवकाळाच्या इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये महाराणी येसूबाईंचे नाव जिजाऊसाहेबांइतकेच आदराने घेतले जाते, ते त्यांच्या संयमी, सहनशील आणि महापतिव्रती व्यक्तिमत्त्वामुळे. छत्रपती शंभूराजांवरील, सर्व संकटांच्या मालिकेत त्या पत्नी म्हणून खंबीरपणे अखंड साथ देत राहिल्या. औरंगजेबाने शंभूराजांना पकडून त्यांची क्रूर हत्या केली त्याही वेळी धीर न सांडता त्यांनी निर्मोही मनाने स्वराज्याच्या हितार्थ राजारामांचे मंचकारोहण केले. राजधानी रायगड शत्रू हाती पडल्यापासून सुमारे ३० वर्षे त्यांनी मुघलांच्या बंदिवासात काढली. संयम, धैर्य आणि त्याग यांची तेजोमूर्ती असलेल्या महाराणी येसूबाईंची गोष्ट इतिहास कट्ट्यावर इतिहास अभ्यासक प्रा. डॉ . रमिला गायकवाड साकारणार आहेत. (Borivali)
(हेही वाचा – Haris Rauf Viral Video : ‘तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा,’ पाकच्या हॅरिस रौफचा अमेरिकेत नाराज चाहत्यांबरोबर दंगा )
कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ
रविवारी, २३ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे ‘ज्ञानविहार ग्रंथालय’, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुल, सी विंग, तिसरा मजला, सोडावाला लेन, बोरिवली (प.), येथे ‘इतिहास कट्ट्या’वर ‘पर्व दुसरे : गोष्ट ‘ती’ची, भाग पहिला – शिवकाळ’ , ‘गोष्ट तिसरी : श्रीसखी राज्ञी जयति – महाराणी येसूबाई’ या विविध कार्यक्रमांतर्गत इतिहास अभ्यासक डॉ. रमिला गायकवाड महाराणी येसूबाईंचा जीवनपट उलगडणार आहेत. या महान स्वराज्यनायिकेविषयी जाणून घेण्यासाठी इतिहास कट्ट्यावर येण्याचे आवाहन भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
महत्त्वाचे –
पावसामुळे गतवर्षाप्रमाणे वनविहार उद्यानाऐवजी प्रबोधनकार ठाकरे नाटयसंकुलातील बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्या ज्ञानविहार ग्रंथालयात रविवार सकाळी ११ वाजता इतिहास कट्ट्याचे आयोजन केले आहे. स्थान आणि वेळेतील बदलाची नोंद कृपया लक्षात ठेवावी तसेच कार्यक्रम नि:शुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. नोंदणी आणि चहापान सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community