जगजीत सिंह (Jagjit Singh) यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थानमधील गंगानगर येथे झाला. त्यांचे वडील सरदार अमरसिंह धामणी हे भारत सरकारचे कर्मचारी होते. जगजीत सिंह यांचे कुटुंब मूळचे पंजाबच्या रोपर जिल्ह्यातील डल्ला गावचे. त्यांची आई बच्चन कौर या पंजाबमधील समरल्ला येथील उत्तालन गावातल्या रहिवासी होत्या. जगजीत यांचे बालपणीचे नाव जीत असे होते.
त्यांच्या गझल गायकीच्या करोडो रसिक श्रोत्यांमुळे जीत सिंग हे काही दशकातच जग जिंकणारे जगजीत सिंग झाले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गंगानगर येथील खालसा शाळेत झाले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते जालंधर येथे आले. त्यांनी डीएव्ही कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून इतिहास या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.
त्यांचा वडिलांना त्यांचे चित्रपट पाहणे फारसे आवडत नव्हते. तरीसुद्धा वडिलांच्या परवानगीशिवाय चित्रपट पाहणे आणि गेटकीपरला लाच देऊन सिनेमागृहात प्रवेश करणे ही त्यांची सवय होती असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. संगीताचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाला. त्यांनी लहानपणी गंगानगर या आपल्या राहत्या गावातच पंडीत छगनलाल शर्मा यांच्याकडून दोन वर्षे शास्त्रीय संगीताची दीक्षा घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी शास्त्रीय संगीतातील सैनिया घराण्याचे उस्ताद जमाल खान यांच्याकडून ख्याल, ठुमरी आणि धृपदाच्या अगदी बारीक हरकतींचे शिक्षण घेतले. जगजीत यांच्या वडिलांना वाटायचं की त्यांनी आयएएस व्हावे पण त्यांना गायक व्हायचे होते. म्हणून ते मुंबईत निघून आले.
मुंबईत (Mumbai) आल्यानंतर ते भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहिले आणि त्यांची स्ट्रगल सुरू ठेवली. ते जाहिरातींसाठी जिंगल्स गाऊ लागले तर कधी कोणाच्या लग्नकार्यात लोकांचे मनोरंजन करू लागले. पण त्यानंतर त्यांना हळूहळू काम मिळत गेले. त्यांचा पहिला म्युझिक अल्बम एचएमव्ही कंपनीने लॉन्च केला होता. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आज जगजीत सिंह यांच्या गझला आपल्याला निखळ आनंद मिळवून देतात.
(हेही वाचा – Free Hindu Temples : हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणातून मुक्तता व्हावी; विश्व हिंदू परिषदेची मागणी )
जगजीत सिंह यांनी त्यांच्या रोमॅंटिक आयुष्यातली एक गोष्ट एका मुलाखतीत सांगितली. आयुष्यातले पहिले प्रेम त्यांना मिळू शकले नाही. त्या दिवसांची आठवण करून देताना एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, “माझं एका मुलीवर प्रेम होतं. जालंधर या ठिकाणी शिकत असताना केवळ सायकलवरूनच प्रवास करावा लागत होता. सायकलची चेन निघाली किंवा टायरची हवा संपण्याच्या बहाण्याने ते मुलीच्या घरासमोर तासनतास बसून त्या मुलीवर लक्ष ठेवायचे. पुढे बाईक घेऊनही ते त्या मुलीच्या घरासमोर उभे राहायचे. . त्यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. काही वर्गात तर त्यांनी चक्क दोन वर्षे घालवली.” जालंधरमध्ये असताना डीएव्ही गर्ल्स कॉलेजमध्ये खूप फिरायचे. एकदा ते आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात महिला गटाच्या सभेला गेले आणि गाणी म्हणू लागले. गायक नसते तर ते कोण झाले असते? असे विचारले असता ते म्हणाले होते की, “गायक नसतो तर मी धोबी झालो असतो.”
हेही पहा –