जावेद अख्तर हिंदी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध लेखक आणि गझलकार. त्यांची मुलं, झोया अख्तर आणि फरहान अख्तर आणि पत्नी शबाना आखमीदेखील बॉलिवुडशी संबंधित आहेत; पण तुम्हाला माहिती आहे का की जावेद अख्तर यांचे वडील कोण होते? चला तर… आज त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांची माहिती सांगतो.
जावेद अख्तर यांच्या वडिलांचे नाव जान निसार अख्तर (Jan Nisar Akhtar) असे होते. ते २०व्या शतकातील एक महत्त्वाचे उर्दू कवी, गीतकार होते. जान निसार अख्तर यांनी १९३५-३६ मध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातून उर्दूमध्ये सुवर्णपदक मिळवून एम.ए. पूर्ण केले. १९४७ मध्ये फाळणी होण्यापूर्वी ते ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये उर्दूचे प्राध्यापक होते आणि त्यानंतर १९५६ पर्यंत भोपाळच्या हमीदिया कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.
१९७६ मध्ये त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award) देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी अनारकली, नूरी, प्रेम पर्वत, रझिया सुलतान, बाप रे बाप इ. चित्रपटांतील गाणी लिहिली आहेत आणि त्यांची सगळी गाणी सुपरहिट झाली. त्यांचे वडील मुख्तार खैराबादी आणि पणजोबा फझल-ए-हक खैराबादी हे देखील शायर होते. त्यांनी जवळजवळ ४ दशकं काम केले. सी. रामचंद्र, ओ.पी. नय्यर, दत्ता नाईक असा दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी एकूण दीडशे गाणी लिहिली.
१९ ऑगस्ट १९७६ रोजी मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले, तेव्हा कमल अमरोही यांच्या रजिया सुलतान या चित्रपटात काम करत होते. नूरी या चित्रपटातील “आजा रे मेरे दिलबर” या गीतासाठी त्यांना १९८० मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मरणोत्तर फिल्मफेअर नामांकन मिळाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community