“कविता आणि जीवन म्हणजे या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहेत; सामान्यतः आपण जीवनात ज्या गोष्टी वास्तविकता स्वीकारतो, त्याच गोष्टी आयुष्यात असतात, परंतु या विसंगत आणि अव्यवस्थित जीवनाचा देखावा कवीच्या प्रतिभेला किंवा वाचकाच्या कल्पनेला संतुष्ट करू शकत नाही… कवितेमध्ये वास्तविकतेची संपूर्ण पुनर्रचना नसते; तर आपण एका नवीन विश्वात प्रवेश करतो.” हा संदेश आहे कवीश्रेष्ठ जीवनानंद दास यांचा…
जीबनानंद दास (Jeevanand Das) यांचा जन्म १७ फेब्रुवारी १८९९ रोजी बंगालमध्ये झाला. जीबनानंद दास हे बंगाली कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना “रूपशी बांग्लार कबी” म्हणजे ‘सुंदर बंगालचा कवी’ असे म्हटले जाते. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये रविंद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम यांच्यानंतर दास हे सर्वाधिक लोकप्रिय कवी आहेत. त्यांच्या काळात दास यांना कवी म्हणून फारशी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली नाही.
(हेही वाचा –CRIME: लैंगिक अत्याचार करणाऱ्या नौशाद शेखच्या अनधिकृत बांधकामावर फिरला बुलडोझर )
खरेतर त्यांनी विपुल लेखन केले, परंतु ते एकांतप्रिय आणि अंतर्मुख असल्याने त्यांनी त्यांचे बहुतेक लेखन त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले नाही. त्यांच्या बहुतेक रचना रसिकांसमोर आल्या नव्हत्या. त्यांच्या कवितांचे केवळ सात खंड प्रकाशित झाले होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर बंगाली रसिकांना सुखद धक्का बसला. कारण दास यांनी कवितांव्यतिरिक्त २१ कादंबऱ्या आणि १०८ लघुकथा लिहिल्या होती. रूपोशी बांग्ला, बनालता सेन, महापरिस्थिती, श्रेष्ठ कविता या त्यांच्या उल्लेखनीय रचना आहेत.
त्यांच्या सुरुवातीच्या कवितांमध्ये काझी नजरुल इस्लाम यांचा प्रभाव दिसून येतो, परंतु २० व्या शतकाच्या उत्तरार्धात, बंगाली कवितांच्या निर्मितीमध्ये दास यांचा प्रभाव निर्माण झाला. हयात असताना त्यांना जो सन्मान मिळाला नाही, तो मृत्यूनंतर मिळाला. दास यांना १९५३ मध्ये अखिल बंगाल रवींद्र साहित्य संमेलनात रवींद्र-स्मारक पुरस्कार मिळाला.
दास यांच्या श्रेष्ठ कविता या पुस्तकाला १९५५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट निर्मित, संदीप चट्टोपाध्याय दिग्दर्शित ‘सुंदर जीवन’ नावाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपट दास यांच्या जमरूटोला या लघुकथेवरून घेतला होता. २२ ओक्टोबर १९५४ मध्ये त्यांचे निधन झाले.
हेही पहा –