जुहू बीच हे भटकंतीसाठी लोकप्रिय ठिकाण असण्याबरोबरच मुंबईतील रस्त्यावरील खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर खवय्यांना त्यांना हव्या त्या चटकदार, मसालेदार स्ट्रिट फूडचा आनंद घेता येतो. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याची मज्जा अनुभवताना भूक लागली, तर खाण्याचीही चंगळ होते. पाव भाजीपासून, आंबट-गोड पाणीपुरी, चवदार भेळपुरीपर्यंत अनेकविध पदार्थ येथे विकत मिळतात. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत भाजलेला मका, समोसा चाट, थंडगार कुल्फी…अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या विविध पदार्थांची चव येथे चाखायला मिळते. (Juhu Beach Mumbai Maharashtra)
जुहू हा मुंबईतील प्रसिद्ध, हवेशीर समुद्रकिनारा आहे. येथे जुहू बीच, पृथ्वी थिएटर, स्टुडिओ आणि इस्कॉन मंदिर आहे. जे पाहायला पर्यटक येतात. शहरातील सर्वात श्रीमंत परिसरापैकी हा एक परिसर आहे. या भागात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. हिप पब, डिस्को, असंख्य हॉटेल्स आणि रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थ जुहूमध्ये मिळतात. ३० रुपयांपासून अगदी १५० रुपयांपर्यंत पदार्थ येथील समुद्रकिनाऱ्यावर विकत मिळतात. (Juhu Beach Mumbai Maharashtra)
(हेही वाचा – Super Expressway : देशात तयार होणार ‘सुपर एक्स्प्रेस-वे’)
फार्मविले कॅफे
हे इस्कॉन मंदिराजवळ आहे. सॅलड, पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ, आरोग्यदायी पेये, प्रसिद्ध एवोकॅडो टोस्ट असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ येथे खायला मिळतात.
चाट आणि फास्ट फूड
चाट आणि फास्ट फूड विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी समुद्रकिनाऱ्यावर रांगा लावल्या आहेत , ज्यामुळे तुम्हाला मुंबईच्या स्ट्रीट-फूडची चंगळ येथे पाहायला मिळते.
पाणी पुरी, भेळ पुरी
स्ट्रीट फूड संस्कृतीसाठी जुहू बीच परिसर प्रसिद्ध आहे. पाणी पुरी, भेळ पुरी, वडा पाव, शेव पुरी आणि पाव भाजी,रागडा पॅटिस, दाबेली, फालुदा अशा अनेक पदार्थांचा आनंद येथे घेता येईल.
तिबेटीयन मोमो
चिनी हक्का नूडल्स, दक्षिण भारतीय डोसा, इटालियन पिझ्झा, थाई करी
किंमत ५० रु. ते २०० रुपये
हेही पहा-
Join Our WhatsApp Community