Kannadasan: तामिळनाडू सरकारचे ‘रॉयल पोएट’ आणि प्रसिद्ध गीतकार !

मणीमंडपमची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एम.जी.आर यांनी १९८१ साली केली होती.

150
Kannadasan: तामिळनाडू सरकारचे 'रॉयल पोएट' आणि प्रसिद्ध गीतकार !

कन्नदासन यांचा जन्म २४ जून १९२७ साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सताप्पा चेट्टियार आणि आईचं नाव विशालाक्षी असं होतं. कन्नदासन हे एक प्रसिद्ध तामिळ गीतकार आणि कवी होते. त्यांनी ४ हजारांपेक्षा जास्त कविता, ५ हजारांपेक्षा जास्त चित्रपटांतील गाणी आणि कित्येक लेख लिहिले आहेत.

कन्नदासन हे चंदमारुथम, थिरुमल, थिरा ओली, थेरल, थेरालथिराई, मुल्लाई आणि कन्नाथासन या मासिकांचे संपादक होते. ते तामिळनाडू सरकारचे “रॉयल पोएट” ही होते. त्यांना १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचं प्राथमिक शिक्षण सिरकुडलपट्टी आणि अमरावतीपुथूर हायस्कूलमध्ये आठवीपर्यंत झालं. पुढे १९४३ साली ते तिरुवोत्तियूर एजॅक्स येथे जॉईन झाले. नियतकालिकांचे संपादक म्हणून काम करायला लागल्यावर कन्नदासन हे नाव ते वापरू लागले. त्यांचे खरे नाव मुथिया असे होते.

२४ जुलै १९८१ साली कन्नदासन यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना शिकागो इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच वर्षी १७ ऑक्टोबर या दिवशी भारतीय वेळेप्रमाणे १० वाजून ४५ मिनिटांनी ते अनंतात विलीन झाले. २० ऑक्टोबर या दिवशी त्यांचं पार्थिव अमेरिकेतून चेन्नई येथे आणण्यात आलं. त्यावेळी लाखो लोकांनी त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण केली. पुढे २ दिवसांनी २२ ऑक्टोबर या दिवशी शासकीय सन्मानाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

(हेही वाचा – माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार, Eknath Shinde यांची ग्वाही)

तामिळनाडू सरकारने कन्नदासन यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी शिवगंगाई जिल्ह्यातील कराईकुडी गावातल्या नवीन बस स्थानकाजवळ काविरासू कन्नदासन मणीमंडपमची स्थापना केली आहे. हा मणीमंडपम उभारण्यासाठी जवळजवळ रु. ८४ लाख एवढा खर्च आला आहे.

या मणीमंडपमची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एम.जी.आर यांनी १९८१ साली केली होती. पुढे १९९० साली मुख्यमंत्री कलैग्नार करुणानिधी यांच्या हस्ते त्याची पायाभरणी करण्यात आली होती. १९९२ साली मुख्यमंत्री श्रीमती एम. जयललिता यांच्या हस्ते या मणीमंडपमचं उद्घाटन करण्यात आलं. २ मजल्यांच्या मणीमंडपममध्ये वरच्या मजल्यावर नाट्यगृह आणि खालच्या मजल्यावर २४०० पुस्तकांचं ग्रंथालय आहे. याव्यतिरिक्त कविरासू कन्नदासन यांच्या चरित्राशी संबंधित असलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शनही ठेवण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.