आग्रा येथील मीना बाजारातील राजा रामसिंग यांच्या कोठीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शंभर फूट उंचीचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्य्राच्या लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सवात बुधवारी केली. सोबतच राज्यात युक्तिदिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. लाल किल्ल्यातील जहाँगीर महाल परिसरातही थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला. लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते. ( Devendra Fadanvis)