Mahindra Bolero Neo Plus : महिंद्राची ‘ही’ ९ सीटर बोलेरो कार लाँच

4214
Mahindra Bolero Neo Plus : महिंद्राची 'ही' ९ सीटर बोलेरो कार लाँच
  • ऋजुता लुकतुके

अखेर भारतीय बनावटीची सगळ्यात मोठी म्हणजे ९ सीटर एसयुव्ही कार भारतात लाँच झाली आहे. महिंद्रा बोलेरो निओ प्लस नावाची ही गाडी अगदी अँब्युलन्स म्हणूनही वापरता येते. किंबहुना सगळ्यात आधी गाडीचा तसाच वापर भारतात सुरू झाला आहे. १३.९९ लाख रुपयांपासून या गाडीची सुरुवात होतेय. आणि टाईप २ अँब्युलन्स म्हणूनही ही गाडी वापरली जाऊ शकते. (Mahindra Bolero Neo Plus)

सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध असलेली गाडी ही २.२ पेट्रोल इंजिनाचीच आहे. म्हणजे बोलेरे गाडीचं इंजिन बदललेलं नाही. ११८ बीएचपी इतकी शक्ती या इंजिनातून निर्माण होऊ शकते. ६ स्पीडचा स्वयंचलित गिअरबॉक्सही यात आहे. गाडीतील बहुतेक फिचर हे बोलेरो निओ गाडीतील असतील. गाडीत १२.७ चार्जिंग सॉकेट असेल. आणि गाडीतील इन्फोटेनमेंट डिस्प्ले स्क्रीन हा ६.७ इंच इतका असेल. (Mahindra Bolero Neo Plus)

(हेही वाचा – Prakash Ambedkar : वंचितचा महाविकास आघाडीला अल्टिमेटम; ‘या’ दिवसानंतर स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणार )

गाडीत चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या एकाला एअरबॅगचं संरक्षण मिळेल. तर चालकाच्या सुरक्षेसाठी एबीएस प्रणालीही यात बसवण्यात आली आहे. लहान कारच्या किमतीत मोठी कार असं वर्णन कंपनीने या कारचं केलं आहे. कारण, या गाडीची आसन क्षमता ७ आणि ९ माणसांची आहे. तरीही पाठीमागे बऱ्यापैकी सामन ठेवण्याची जागा आहे. (Mahindra Bolero Neo Plus)

करडा, काळा, लाल आणि पांढऱ्या रंगात सुरुवातीला ही कार उपलब्ध असेल. स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओ एन गाडीशी साधर्म्य असलेली अशी ही कार आहे. (Mahindra Bolero Neo Plus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.