Marine Drive Kochi Kerala: केरळमधील ‘हे’ ठिकाण प्रसिद्ध का आहे? जाणून घ्या…

284
Marine Drive Kochi Kerala: केरळमधील 'हे' ठिकाण प्रसिद्ध का आहे? जाणून घ्या...
Marine Drive Kochi Kerala: केरळमधील 'हे' ठिकाण प्रसिद्ध का आहे? जाणून घ्या...

मरीन ड्राईव्ह…हे कोचीमधील (केरळ) सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. निसर्गरम्य भव्य कोची बंदर…येथील मनाला आणि डोळ्यांना सुख देणारी दृष्ये यामुळे स्थानिक तसेच परदेशातील पर्यटकही या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. इथल विशेष आश्चर्य म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी फिरण्याचा आनंद घेण्यासाठी लोकं येथे येतात. (Marine Drive Kochi Kerala)

मानवनिर्मित चमत्कारांचा अद्वितीय नमुना…
या परिसराच्या आजूबाजूला असंख्य उपहारगृहे आणि मॉल्स आहेत. त्यामुळे पर्यटक, स्थानिक खरेदीदार येथे मनमुराद खरेदी करण्याचा आनंद घेऊ शकतात. सागरी किनारी गेलो आणि बोटीने फिरण्याचा आनंद घेतला नाही, असे व्हायलाच नको. याकरिता येथे अनेक बोट जेट्टी आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बोट जेट्टी कॉम्प्लेक्सदेखील आहे. रात्रीच्या वेळी तर येथे फिरण्याची मज्जा काही औरच असते. खवय्या आणि पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना तर इंद्रधनुष्य पूल आणि त्यावरील विविधरंगी दिवे…यामध्ये फिरताना उत्साह जाणवल्याशिवाय राहणार नाही. लहान-मोठ्या दिव्यांनी उजळून निघालेला इंद्रधनुष्य पूल पाहणे ही मरीन ड्राईव्हला भेट देणाऱ्यांसाठी विशेष पर्वणी असते. हा संपूर्ण परिसर विस्तीर्ण महानगराच्या मध्यभागी नैसर्गिकत:च विखुरलेला मानवनिर्मित चमत्कारांचा एक अद्वितीय नमुना आहे.

Marine Drive - a popular hangout in Kochi, Ernakulam ...

निसर्गरम्य समुद्रकिनारा, करमणुकीचे अनेक पर्याय, वॉकवे
कोचीमधील हे शांत आहे. येथील मरीन ड्राईव्ह हे फिरण्यासाठी, नयनरम्य विहार करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे. त्यामुळे येथे स्थानिक लोकंही आवर्जून येतात शिवाय पर्यटकही वारंवार येतात. कोची बंदरावर नजर टाकल्यास निसर्गरम्य समुद्रकिनारा…खाद्यपदार्थांची विविध ठिकाणे, करमणुकीचे अनेक पर्याय…गगनचुंबी इमारती…शॉपिंग मॉल्स, वॉकवे असल्यामुळे कोणत्याही वाहनांना येथे परवानगी नसते.

(हेही वाचा – Igatpuri Resorts : ही आहेत इगतपुरी मधील टॉप ५ फॅमिली रिसॉर्ट्स )

विस्तीर्ण पसरलेला वेम्बनाड तलाव
सकाळी लोकं येथे जॉगिंग करण्यासाठी येतात. सूर्योदयाचा आनंद घेताना दिसतात. विस्तीर्ण पसरलेला वेम्बनाड तलाव, वातावरणातून येणारी थंड हवेची झुळुक. सारेच आल्हाददायक वाटते. हा परिसर हायकोर्टाच्या जंक्शनपासून सुरू होऊन राजेंद्र मैदानापर्यंत जाणाऱ्या पदपथापर्यंत पसरलेला असल्याने शेकडो लोकं येथे सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी येतात. या परिसराला भेट दिल्यानंतर या मार्गावरील बोट जेट्टी पाहायला विसरू नका.

पदपथावरील काही लोकप्रिय ठिकाणे
मरीन ड्राइव्ह पदपथावरील काही लोकप्रिय ठिकाणांमध्ये हाऊस बोट ब्रिज, चायनीज फिशिंग नेट ब्रिज आणि रेनबो ब्रिज यांचा समावेश आहे. हा पदपथ तीन किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. येथील सूर्यास्त आणि सूर्योदयाचे सौंदर्य बघणे हा एक अद्भुत आणि अलौकिक अनुभव आहे, असेच म्हणावे लागेल. मरीन ड्राइव्हजवळील चिल्ड्रन्स पार्क आणि सुभाषचंद्र बोस पार्क ही दोन ठिकाणेही प्रसिद्ध असून पर्यटकांना येथे फिरायला आवडते. याशिवाय बोलगट्टी पॅलेस, कोचीन शिपयार्ड, वल्लारपडोम टर्मिनल, ज्यूइश सिनेगॉग, मट्टनचेरी पॅलेस आणि ज्यू स्ट्रेट्स यासह कोचीमध्ये फिरण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथून नौका सेवा उपलब्ध आहेत.

जवळचे रेल्वे स्थानक – एर्नाकुलम, ३ किमी.
जवळचे विमानतळ – कोचिन इंटरनॅशनल एअरपोर्ट, २९ किलोमीटर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.