लिहायला बोलायला सध्या कोरोना पलीकडे काही नाही. अगदी संडासात जरी बसलात तरी हल्ली कोविडशिवाय काहीच विचार येत नाही. कोणी भेटला बोललात तरी विषय कळत नकळत कोविडकडे! फोनवर बोलले तरी तेच…चोवीस तास कोविडचा विचार आणि आचार! म्हणजे हा एक आजार तर नाही ना? इंग्रजीत ह्या आजाराला कदाचित ‘Rumination’ अर्थात ‘अनावश्यक चिंतन’ असे म्हणतात. म्हणजे सतत तोच तोच नकारात्मक विचार! जो दुःखाकडे किंवा कदाचित डिप्रेशनकडे मनुष्याला घेऊन जातो. मानसिक आजार अनेक आहेत, त्यात सध्या हा कोरोनाचे नकारात्मक विचार घेऊन आलेला नवीन प्रकार आहे.
७० टक्क्यांहून अधिक नागरिक पीडित!
सध्या जगभर माणूस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोविड आणि संबंधित आजाराचा विचार करीत असतो. ‘काल कोरोना शेजारीपाजारी आला, आज माझ्याकडे येणार का? माझी ऑक्सिजन लेव्हल बरोबर आहे ना? मी किंवा कुटुंबातील कोणी आजारी पडला तर बेड मिळेल का? आयसीयू मिळेल का? मी कोरोनातून बरा झाल्यावर मला आता बुरशी लागेल का?, असे भीतिदायक विचार परत परत येत असतात. कदाचित भारतात 70 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक ह्या अशा निराशावादी आणि भयावह आजारातून जात असतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रमाण कमी जास्त असेल पण हा विकार बहुतांशी लोकांना नक्कीच असेल. एका वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे, What is rumination? … The process of continuously thinking about the same thoughts, which tend to be sad or dark, is called rumination. A habit of rumination can be dangerous to your mental health, as it can prolong or intensify depression as well as impair your ability to think and process emotions. आणि दुसरा प्रत्यक्ष अर्थ म्हणणे रवंथ करणे…गाई-म्हैशी, जे अगोदर खाल्लेले अन्न परत परत चावत बसतात ती प्रक्रिया म्हणजे “रवंथ”.
(हेही वाचा :केरळचा ‘1 टक्का डोसिंग पॅटर्न’!)
सकारात्मक विचार पद्धती प्रभावी उपाय!
कोविड व्याधी टाळण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात आणि रोज त्यात बदल केले जातात, पण न बदलणारा विषय म्हणजे सकारात्मक विचार पद्धती. कोणी म्हणते कोविडची किड ऑलोपॅथी औषधाने मरते, तर कोणी म्हणतो होमियोपॅथी किंवा आयुर्वेद जास्त परिणामकारक आहे. काढा ते वाफ वाया गरम पाणी असे अनेक मार्ग निवडले जातात. निसर्गोपचारापर्यंत मजल गेली आहे. कोरोना बरे होण्यासाठी पर्याय आणि वैद्यकीय शाखा अनेक आहेत, मात्रा लागू होणे गरजेचे आहे. पण कोरोना जो डोक्यात शिरून भुंगा करतो त्यावर कायमचा उपाय काय आहे? अजून अनुत्तरित प्रश्न आहे तो!!! औषधी विषय थोडा बाजूला ठेऊया.
काय आहेत उपाय Rumination आजारावर?
- नकारात्मक बाबीतून स्वतःला विलग करा!: म्हणजे कसे, तर कोणाला फोन करून कोरोनाचे विषय सोडून गप्पा करा, सिनेमा बघा, पुस्तक वाचा किंवा आवडीचा एखादा विषय घेऊन त्यात वेळ घालावा, असे अपेक्षित आहे
- ऍक्टिव्ह ऍक्शन प्लॅन बनवा! : प्लॅन करणे आणि तो प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे ह्यासाठी इच्छाशक्ती तयार करणे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, त्यात रोज उद्या सुरुवात करतो, असे व्हायला नको!
- तुमच्या नकारात्मक विचाराला प्रश्न विचारा! : किती साधा सरळ उपाय आहे. स्वतःला प्रश्न विचारून त्यातून नकारात्मक उत्तर मिळत असेल तर असा नकारात्मक विचार संपवून टाका.
- जीवनातील ध्येय रेषा बदला! : नकारात्मक विचारामुळे आपण बरेच पाठी गेलेले असतो, तेव्हा कमीपणा न मानता आपला life goal बदलू शकता. दोन पावले पाठी आल्याने आपल्याना मोठी उडी मारता येते, तेव्हा कुठलाही न्यूनगंड न बाळगता थोडे पाठी सरकून मोठी उडी मारायची तयारी करा.
- स्व:प्रशंसा प्रक्रिया वाढवा! : कोरोनाचे अक्राळ विक्राळ रूप पाहून आपण स्वतःला खोलात नेतो, खोचत बसतो. पण आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःची प्रशंसा स्वतः मनात करत बसा. अशा प्रक्रियेमुळे नकारात्मक विचाराला नकळत तिलांजली मिळेल.
- योग्य योग पद्धती आणि विपश्यना! : घरच्या घरी रोज योगा करणे, मनःशांती साठी योग्य उपाय जे अनेक धुरीणांनी सांगितले आहेत ते अमलात आणणे ही सर्वाधिक मोठी उपाययोजना आहे. कुठल्याही व्याधी असो मन:शांती महत्वाची आणि मनःशांतीसाठी योगा, व्यायाम, विपश्यना, मनन इत्यादी अनेक विषय आहेत, ज्यावर भर देणे गरजेचे आहे.
- ट्रिगर दाबा! : म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा नकारात्मकता मनात उगवेल, तेव्हा सकारात्मक विचाराचा ट्रिगर दाबा. सर्व प्रकारे नकारात्मक विचार थांबेल ह्याची दक्षता घ्यायची
- मानस तज्ज्ञांशी सल्लामसलत! : नकारात्मक विचार अगदीच टोकाला जात असतील तर मानस तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
(हेही वाचा : कोरोनासंबंधी आरोग्य सेवा आणि उद्घाटन नावाचा बाजार!)
कोणी म्हणेल हे उपाय केल्याने कोरोना होणार नाही किंवा बरा होईल का? पण हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठलाही रोग, त्रास इत्यादी शारीरिक नकारात्मक बाबीसाठी औषधे आहेत, वरील पर्याय मानवी अवस्था शांतीसाठी आहेत. वरील विविध उपाय प्रातिनिधीक स्वरूपाचे आहेत, पण वेळ, काळ, स्थळ आणि व्यक्ती गणिक वेगवेगळे उपाय असू शकतात. मी कोरोना काळात माझ्या मुलीच्या हट्टामुळे कदाचित पण घरी मनीमाऊ (मांजरे) पाळल्यात, ज्यांच्या निव्वळ अस्तित्वाने माझ्या घरातील वातावरण सकारात्मक झाले आहे. असो. कोरोनाची लढाई देशाच्या सीमेवरच्या लढाईपेक्षा कठीण आहे. औषधे आणि सकारात्मक विचार यांच्या युतीनेच कोरोनावरील विजय निश्चित आहे. तेव्हा Rumination चा बँड बंद आणि म्हणा “All is well (आल इस वेल)!
Join Our WhatsApp Community