Modak Recipe: नवशिक्यांसाठी ‘उकडीचे मोदक’ तयार करण्याची सोपी पद्धत कोणती?

सर्व प्रकारच्या मोदकांमध्ये 'उकडीचे मोदक' हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि साऱ्यांच्या आवडीचे असतात.

237
Modak Recipe: नवशिक्यांसाठी 'उकडीचे मोदक' तयार करण्याची सोपी पद्धत कोणती?

गणपती बाप्पाचा अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे ‘मोदक’. मोदकाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही आणि इतरांनाही मोदकांचा प्रसाद खाल्ल्याशिवाय पूजेचा आनंद मिळत नाही. इतकं मोदक आणि भक्तांचं जवळचं नातं आहे. गणपतीच्या दिवसांमध्येच नाही, संकष्टी, अंगारिका किंवा अगदी मंगळवारीसुद्धा मोदकाचा नैवेद्य काही जण दाखवतात. उकडीचे, गव्हाचे, रव्याचे, खव्याचे…असे विविध प्रकार मोदकाचे आहेत, पण सर्व प्रकारच्या मोदकांमध्ये ‘उकडीचे मोदक’ हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि साऱ्यांच्या आवडीचे असतात. पाहूया या मोदकांची सोपी पाककृती – (Modak Recipe)

साहित्य
२ कप तांदूळ किंवा मोदकाचे पीठ, २ कप पाणी, २ चमचे तूप, २ चमचे दूध, अर्धा चमचा मीठ

सारणासाठी
२ चमचे तूप, २ कप किसलेले खोबरे, दीड कप किसलेला गूळ, १ कप वेलची पूड, १ कप खसखस, ५ चमचे बारीक किसलेले काजू-बदाम

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : कंगनाला मोदी मॅजिक आणि स्वतःच्या स्टारडमवर विश्वास )

मोदक करण्याची पद्धत (Modak Recipe)
१. सर्वप्रथम उकड काढून घेऊ. त्यासाठी पातेले किंवा कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. पाण्यात मीठ, तूप व दूध घाला.
२. पाण्याला उकळी आली की, गॅस बंद करा. ह्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि पटपट मिक्स करून घ्या. भांड्यावर घट्ट झाकण घाला. कमीत कमी पंधरा मिनिट तरी पीठ झाकून ठेवा. प्रत्येक वेळी एका वाटीची उकड काढून घेतली तर मोदक खूप सुंदर, लुसलुशीत होतात.
३. आता सारण करण्यासाठी एक कढई गॅसवर गरम करत ठेवा. त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाले की, त्यात खोवलेले ओले खोबरे व चिरलेला गूळ घाला. वेलची पूड, खसखस आणि काजू बदाम बारीक चिरून घाला. गूळ पुर्णपणे विरघळल्या नंतर दोन मिनिट अजून परतून घ्या आणि गॅस बंद करा. लगेच सारण एका प्लेट मध्ये काढून घ्या.जास्त वेळ सारण परतू नका त्यामुळे सारण घट्ट होते आणि मोदक भरताना फाटण्याची शक्यता असते.
४. आता पीठ एका परातीत घेऊन उकड थोडी गरम असताना मळायला सुरुवात करा. तेल पाण्याचा हात लावून उकड मऊ मळून घ्या. जेवढा जास्त वेळ उकड मळून घ्याल तेवढं पीठ छान तयार होईल. छोट्या लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्या आणि बोटाने दाबून-दाबून पारी कारावी. एक चमचा सारण भरून मोदकाच्या पाकळ्या करा. शेंड्याला पाकळ्या थोड्या दाबून घ्या त्यामुळे मोदकाला आकार देणे सोपे जाते.आता मोदक हळूहळू बंद करून घ्या. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या.
५. मोदक पात्रात पाणी गरम करावयास ठेवावे. ज्या चाळणी मध्ये मोदक उकडणार आहोत त्याला तेल लावून घ्या आणि एकेक करून मोदक ठेवून द्या. मोदक पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे. थोडे थंड झाले की सर्व मोदक एका डब्यामध्ये मध्ये काढून घ्या.
६. मस्त लुसलुशीत मोदक तुपाबरोबर सर्व्ह करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.