मुकेश धीरूभाई अंबानी हे एक भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुकेशजी हे आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत, तर संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा ११वा क्रमांक येतो.
मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ साली येमेन येथील ब्रिटिश क्राऊन कॉलनीमध्ये झाला. कोकिलाबेन अंबानी असं त्यांच्या आईचं नाव होतं. मुकेशजी यांच्या जन्मानंतर १९५८ साली धीरूभाई यांनी येमेन येथून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी स्वतःचा मसाले आणि कापडाचा ट्रेडिंगचा व्यापार सुरू केला. ‘ओन्ली विमल’ या नावाने त्यांचा व्यापार प्रसिद्ध होऊ लागला. ते भारतात आल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली.
(हेही वाचा – Lok Sabha Election Phase 1: लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच मतदान सुरू, पंतप्रधान मोदींकडून खास मराठीत देशवासीयांना आवाहन)
शैक्षणिक वाटचाल…
मुकेशजी अंबानी यांनी मुंबईतील हिल ग्रॅंज हायस्कूलमध्ये आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सेंट झेवीयर्स कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनियरिंग या विषयात बीई ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी एमबीए करण्यासाठी स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी येथे ऍडमिशन घेतलं. पण १९८० साली त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या रिलायन्स या कंपनीला सांभाळण्यासाठी त्यांना परत भारतात बोलावून घेतलं गेलं.
रिलायन्स कंपनीची धुरा सांभाळली…
त्यावेळी रिलायन्स हा एक लहान पण सातत्याने विकसित होणारा उद्योग होता. धीरूभाई यांना असं वाटत होतं की, आपल्यातली कौशल्ये अनुभवांच्या आधारे वापरता येतात, एखाद्या वर्गात बसून नव्हे. त्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीतल्या सूत उत्पादनाची धुरा सांभाळण्यासाठी मुकेशजी यांना भारतात परत बोलावून घेतलं. भारतात परत आल्यानंतर मुकेशजी अंबानी यांनी रिलायन्स कंपनीची धुरा सांभाळली आणि त्यांना व्यवसाय उत्तरोत्तर वाढायला लागला. आज मुकेशभाई हे खूप मोठे उद्योजक आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community