मेजर सरस त्रिपाठी
भारताच्या सुरक्षेविषयक सिद्धांतामध्ये भारताला अडीच आघाडीवर युद्ध करावे लागणार आहे. कालपर्यंत भारताला पाकिस्तान आणि चीनसोबत एकाचवेळी युद्ध करावे लागणार अशी परिस्थिती होती; पण आता देशाचा सुरक्षा सिद्धांत बदलला आहे. हे युद्ध अडीच आघाड्यांवर लढावे लागणार आहे. जर युद्ध झाले तर भारताला एकाच वेळी एक नव्हे तर दोन मोठ्या शत्रूंचा सामना करावा लागेल, त्यात पाकिस्तान आणि चीन हे दोन शत्रू राष्ट्रे आहेत. लष्करी परिभाषेत याला दोन आघाडीचे युद्ध म्हणतात. पण त्याच वेळी भारताला अर्ध्या आघाडीवरही लढावे लागणार आहे. ज्यात शत्रू भारतीयच आहेत.
आता जर युद्ध झाले तर ते भारतासाठी खूप कठीण युद्ध असेल ज्यामध्ये भारताला दोन बाजूंनी बाहेरील आणि दृश्यमान शत्रूंशी लढावे लागेल आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या आत लपलेल्या अनेक ‘ज्ञात आणि अज्ञात’ शत्रूंशी लढावे लागेल. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी या अर्ध्या आघाडीचा मुखवटा फाडला. तेव्हा त्यात केवळ बॉम्बस्फोट घडवणारे दहशतवादीच नाही, तर पांढरपेशा नोकरशहा/राजकारणी, लेखक-कवी, चित्रपट निर्माते, गायक यांचाही समावेश असल्याचे समोर आले. त्यामध्ये हमीद अन्सारी, जावेद अख्तर, फरहान अख्तर, एस.वाय. कुरेशी (माजी मुख्य निवडणूक आयुक्त) आणि मुनावर राणा यांचा समावेश आहे. हे अंतर्गत शत्रू दोन प्रकारचे आहेत. एक – ‘गझवा-ए-हिंद’ चे स्वप्न पाहणारे आणि दोन – डाव्यांकडून पोसलेले सशस्त्र आणि नि:शस्त्र शहरी नक्षलवादी. हे तेच भारताचे शत्रू आहेत जे भारताचे खातात आणि ‘भारताचे तुकडे होवो’, असा नारा देतात.
आजकाल ही अर्धी आघाडी मोठी झाली आहे. देशभरात पसरलेल्या दहशतवाद्यांव्यतिरिक्त, यामध्ये तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्षल, लुटियन्स मीडिया, खान मार्केट गँग आणि ‘भारत मुस्लिमांसाठी सुरक्षित नाही’ या टोळीचाही समावेश आहे. यात बडे अधिकारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचाही समावेश आहे. तिस्ता सेटलवाड, वरवरा राव, सुधा भारद्वाज, जीएन साईबाबा, गौतम नवलखा, गोन्साल्विस, फादर स्टॅनस्वामी, आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, सुधार धावडे यांसारख्या प्रत्येक जाती आणि धर्मातील लोकांचा समावेश आहे.
भारताला बदनाम करण्यासाठी ही अर्धी आघाडी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काम करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते सनातन धर्म आणि सनातन राष्ट्राचा निषेध करतात, त्यांचे भारतविरोधी लेख न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, डेली मिरर यांसारख्या पाश्चात्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतात. त्यांना निधी देणाऱ्यांची यादी मोठी आहे, ज्यात जॉर्ज सोरोस यांचे नाव सर्वोतोपरी आणि प्रसिद्ध आहे. भारत आणि राष्ट्रहितचिंतकांनी त्यांना ओळखून अर्ध्या आघाडीच्या लढाईत त्यांचा पराभव करावा लागेल. यामध्ये आता न्यूजक्लिक या वेब पोर्टलचा समावेश झाला आहे. या वेब साईटला चीनकडून पैसा पुरवण्यात आल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला मिळाली, त्यानुसार त्यांनी धाडी टाकल्या. यात पाच पत्रकारांवर गुन्हा दाखल झाला. हे पत्रकार चीनचा पैसा घेऊन भारताची बदनामी करत होते. अर्ध्या आघाडीमध्ये आता या शत्रूंची भर पडली आहे.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)