Pandit Sudhakar Chaturvedi: श्री श्री रविशंकर यांचे पहिले गुरु कोण?

    324
    Pandit Sudhakar Chaturvedi: श्री श्री रविशंकर यांचे पहिले गुरु कोण?

    पंडित सुधाकर चतुर्वेदी हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. एवढेच नाही तर ते वैदिक गणिताचे विद्वान आणि इंडोलॉजिस्टही होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचं वय १२२ वर्षे आणि ३१३ दिवस इतकं होतं. काही वृत्तपत्रांनी त्यांना आतापर्यंतचे सर्वांत वृद्ध भारतीय असल्याचा दावा केला आहे. (Pandit Sudhakar Chaturvedi)

    पंडित सुधाकर चतुर्वेदी यांचा जन्म कर्नाटकमधल्या बंगळुरू येथे २० एप्रिल १८९७ साली झाला. त्यांनी अगदी तरुण वयातच हरिद्वार येथील पारंपरिक गुरुकुल असलेल्या कांगरी विद्यापीठातून वेदांचे आणि सर्व शास्त्रांचे देखील अध्ययन केले होते. तरुण असतानाच पंडित सुधाकर चतुर्वेदी हे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या विचारांनी प्रभावित झाले. पुढे त्यांनी आयुष्यभर त्यांची शिकवण आणि आर्य समाजाचा स्वीकार केला.

    (हेही वाचा – Trimbakeshwar Nashik: प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई )

    चतुर्वेदी म्हणजे चारही वेदांचे ज्ञान असणारे विद्वान होय. कांगरी विद्यापीठात असताना पंडितजी स्वामी श्रद्धानंद यांचे शिष्य होते. स्वामीजींनी त्यांना वेद वाचस्पती ही पदवी दिली होती. ही पदवी हल्लीच्या पोस्ट ग्रॅज्युएशन पदवीच्या समतुल्य आहे. पंडित सुधाकर चतुर्वेदी हे गांधीजींचे समकालीन होते. ते गुरुकुलातच त्यांना पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते.

    पंडितजींनी गांधीजींसोबत अनेक स्वातंत्र्य चळवळींमध्ये भाग घेतला होता. गांधींनी व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरलला लिहिलेली पत्रे पंडितजी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे म्हणून त्यांना गांधींचे पोस्टमन म्हणूनही ओळखलं जायचं. विविध स्वातंत्र्य चळवळीत उतरल्यानंतर त्यांना आयुष्यात जवळपास एकतीस वेळा अटक झाली होती. त्यांना पेशावर पासून ते वेल्लोरपर्यंतच्या वेगवेगळ्या कारागृहांमध्ये ठेवण्यात आले होते.

    पंडितजींनी वयाच्या पन्नाशीपर्यंत स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं कार्य केलं. त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्यात स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांचा प्रचार केला. पंडितजी आयुष्यभर अविवाहित राहिले. ते श्री श्री रवी शंकर यांचे पाहिले गुरु होते.

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community

    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.