मल्याळम भाषेतील पहिले महाकवी म्हणजे अझकथू पद्मनाभ कुरुप. ते संस्कृत आणि मल्याळम भाषेतील प्रख्यात विद्वान होते. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंदी भाषेचे प्रशिक्षणही दिले होते. तुलसीदासांचे रामचरितमानस वाचून अझकथू हे रामाचे निस्सीम महान भक्त झाले. त्यांनंतर रामाच्या भक्तीत तल्लीन होऊन त्यांनी ‘रामचंद्रविलासम’ हे महाकाव्य लिहिले.
रामचंद्रविलासम हे महाकाव्य मल्याळम साहित्यात अजरामर ठरले. कारण त्याआधी महाकाव्ये संस्कृतमध्ये रचली जायची. कुरुप हे पहिला कवी होते ज्यांनी मल्याळममध्ये हा काव्यप्रकार आणण्याचे धाडस केले. ज्यावेळी ते महाकवय लिहित होते, त्यावेळी रसिकांना काय वाटते हे त्यांना जाणून घ्यावेसे वाटले. म्हणून त्यांनी काव्यातील काही भाग ’मलायली’ या वृतपत्रात प्रसिद्ध केला. पण रसिकांनी काहीच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांचा हिरमोड झाला.
मग त्यांनी केरल वर्मा या महान कवीला पत्र पाठवून वृत्तपत्रातील महाकाव्याचा सारांशबद्दल अभिप्राय द्यायला सांगितले. केरल वर्मा यांनी लगेच आपला अभिप्राय पाठवून त्यांची स्तुती केली आणि पुढे लिखाण सुरु ठेवण्यास मार्गदर्शन केले. रामचंद्रविलासम या महाकाव्यासोबतच कुरुप यांनी अट्ट कथा (शास्त्री नृत्यावर आधारित संगीत नाटक), नाटक, कलिपट्टू (गीत), खंडकाव्य आणि बालसाहित्य देखील लिहिले आहे. ते शाळेत शिक्षक म्हणूनही काम करत होते. आजही मल्याळम साहित्याचा अभ्यास करताना अझकुथू पद्मनाभ कुरुप यांच्या साहित्याचा अभ्यास करणं प्रशस्त मानले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community