रॉबर्ट बर्नार्ड ऑल्टमन हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता होते. एक काळ होता, जो त्यांनी गाजवला होता. ऑल्टमॅन यांचा जन्म २० फेब्रुवारी १९२५ रोजी, कॅन्सस सिटी, मिसूरी येथे झाला. ते कॅथलिक होते. मात्र तरुण झाल्यावर त्यांनी पंथाचे अनुसरण केले नाही. ते स्वच्छंदी स्वाभावाचे होते.
ऑल्टमन उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अकादमी पुरस्कारासाठी पाच वेळा त्यांना नामांकन मिळाले होते. हॉलीवूडमधील नवीन काळातील ते सर्वोच्च कलाकार होते. त्या काळी ज्या ज्या कलाकारांनी हॉलिवूडचा चेहरा बदलला, त्यामध्ये रॉबर्ट ऑल्टमन यांचे नाव आदराने घेतले जाते.
(हेही वाचा – Pets Registration: पाळीव प्राणी घरी पाळणाऱ्यांच्या घरी धडकणार महापालिकेची पथके, हे आहे कारण )
मॅककॅबे ऍंड मिसेस मिलर, द लॉंग गुदबाय, नॅशव्हिले, ३ वूमन, द प्लेयर, शॉर्ट कट्स, गोस्फोर्ड पार्क हे त्यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट मानले जातात. त्यांनी विविध विषयांवरील चित्रपट केले असले तरी व्यंग आणि विनोदी पद्धतीने आपला मुद्दा मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असायचे.
त्यांचं दिग्दर्शन अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं. केवळ समीक्षकांनीच नव्हे तर प्रेक्षकांनीही त्यांचे कौतुक केले आहे. पॉल थॉमस अँडरसन, वेस अँडरसन, रिचर्ड लिंकलेटर, डेव्हिड गॉर्डन ग्रीन, हार्मनी कोरीन आणि मायकेल विंटरबॉटम या दिग्दर्शकांनी रॉबर्ट ऑल्टमन यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community