संदीप सिंह सैनी यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९८६ साली हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे शहाबाद या गावी झाला. ते एक भारतीय क्रीडापटू आहेत. ते हॉकी खेळायचे. त्यांच्या वडिलांचं नाव गुरुचरण सिंह सैनी तर आईचं नाव दलजीत कौर सैनी असं आहे. त्यांना एक मोठा भाऊ आहे. तोसुद्धा हॉकी खेळाडू होता. संदीप यांनी आपलं शिक्षण मोहाली येथील शिवालिक पब्लिक स्कूल इथून पूर्ण केलं.
संदीप सिंह हे हरियाणा येथील प्रोफेशनल हॉकीपटू (Professional hockey player) होते. तसेच ते इंडियन नॅशनल हॉकी टीमचे कर्णधार होते. त्यांच्या हॉकीमधल्या ड्रॅग फ्लिक शॉटसाठी ते प्रसिद्ध होते. ड्रॅग फ्लिक हा सर्वात वेगवान शॉट असतो. त्यांना फ्लिकर सिंह म्हणूनही ओळखलं जायचं.
संदीप सिंह हे हरियाणाचे डेप्युटी सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच DSP म्हणूनही काम करायचे. २०१९ साली ते भारतीय जनता पक्षातून कुरुक्षेत्रमधील पेहोवा येथून आमदार म्हणजेच MLA म्हणूनही निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी हरियाणाचे क्रीडामंत्री म्हणूनही काम केलं होतं.
संदीप यांनी आपला हॉकीचा पहिला इंटरनॅशनल सामना क्वालालांपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सुल्तान अझलान शाह कप येथे खेळला. त्यानंतर २००९ साली इंडियन नॅशनल हॉकी टीमचे कर्णधार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. २०१० सालापासून त्यांना ड्रॅग फ्लिक हा सर्वात वेगवान शॉट खेळणारे ड्रॅग फ्लिकर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. संदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी टीम आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन करायला लागली. संदीपही टॉप गोल स्कोरर म्हणून नावाजले गेले.
सर्वोत्कृष्ट खेळाडू
२०१० साली संदीप सिंह यांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त त्यांनी खेळलेल्या हॉकीच्या अनेक सामन्यांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केलं गेलं होतं. भारतीय फिल्ममेकर शाद अली याने संदीप सिंह सैनी यांच्या जीवनावर आधारित ‘सुरमा’ नावाचा एक चरित्रात्मक चित्रपट तयार केला होता. या चित्रपटात दलजीत सिंह याने संदीप सिंह सैनी यांची भूमिका साकारली होती.
(हेही वाचा – Veer Savarkar: वीर सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर उपाधी प्रदान करा – अॅड. पारिजात पांडे)
Join Our WhatsApp Community