सोनपापडी…हा उत्तर भारतीय पदार्थ आहे शिवाय मिठाईतील एक गोड पदार्थ आहे. काही जणांच्या अतिशय आवडीचा हा पदार्थ; कारण तोंडात टाकताच विरघळणारा, गोड, खुसखुशीत. बेसन पीठ आणि साखरेचा वापर करून तयार केलेला हा पदार्थ घरी तयार करणे म्हणजे जरा कठीणच. असे वाटत असले, तरी घरीही सोनपापडी बनवता येते. सणासुदीच्या दिवसांत खुसखुशीत, फ्लॅकी टेक्स्चरसह सोनपापडी घरी करून बघायला हरकत नाही. बाजारातली सोनपापडी बऱ्याचदा घरी आणली जाते. याला सोहन हलवा किंवा पतिसा असेही म्हणतात. असे म्हटले जाते की सोन पापडी मूळतः महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील राज्यात बनविली जाते, जिथून त्याची लोकप्रियता गुजरात, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये पसरली.
(हेही वाचा –हिंदू हिंसक असते तर मला स्वातंत्र्य आणि सुरक्षा गमवावी लागली नसती; Nupur Sharma यांनी राहुल गांधींना सुनावले )
सोनपापडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दीड कप बेसन
250 ग्रॅम तूप
दीड कप पाणी
टीस्पून हलकी हिरवी वेलची (ठेचलेली)
1 1/4 कप मैदा
अडीच कप साखर
2 टीस्पून दूध
कृती –
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन आणि मैदा घ्या आणि एकत्र मिक्स करा. त्यानंतर एक जड कढई घेऊन ती मध्यम आचेवर गरम करा. कढई व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात थोडं तूप घाला. कढईत पिठाचे मिश्रण घालून मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तपकिरी रंगाचे झाल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. एकाच वेळी साखरेचा पाक तयार करा. एका भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. आचेवर शिजू द्या. एक उकळी आली की, त्यात दूध घाला. साखरेचा पाक घट्ट झाल्यावर त्याची तार तयार होते. बोटांनी तार तयार झाली का, हे तपासून पहा. आता या तयार केलेल्या साखरेच्या पाकात पिठाचे मिश्रण घाला. एका मोठ्या चमच्याच्या साहाय्याने ते नीट ढवळून घ्यावे. जोपर्यंत त्याला धाग्यासारखा आकार तयार होत नाही. तोपर्यंत ते ढवळावे. ग्रीस केलेल्या पृष्ठभागावर किंवा प्लेटवर या मिश्रणाचा 1 इंच जाडीचा थर पसरवा. त्यात वेलची घाला आणि तळहाताने हलक्या हाताने दाबा.
जर तुम्हाला नारळ आवडत असेल तर तुम्ही त्यावर थोडे किसलेले खोबरेदेखील घालू शकता. आता ते थंड होऊ द्या आणि नंतर 1 इंच चौकोनी तुकडे करा. आता हे हवाबंद डब्यात ठेवा आणि सर्व्ह करा.
30 ग्रॅम सोनपापडीमध्ये खालील पोषक घटक असतात.
कॅलरीज – 170
एकूण चरबी – 9 ग्रॅम
संतृप्त चरबी – 5 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 10 मिग्रॅ
सोडियम 0 मिग्रॅ
कार्बोहायड्रेट 18 ग्रॅम
साखर – 15 ग्रॅम
फायबर – ०%
प्रथिने – 3 ग्रॅम
हेही पहा –
Join Our WhatsApp Community