प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात आई-वडिलांनंतर शिक्षक त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे अनमोल कार्य करतात. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले जीवन शिक्षणासाठी आणि देशातील तरुणांना आकार देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या सन्मानार्थ शाळा, महाविद्यालयांत ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त समाजात विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि सन्मान कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्ही इतरांना शुभेच्छा संदेश देऊ शकता.
(हेही वाचा – Severe Rainfall Alert : गंभीर पावसाचा इशारा कसा दिला जातो? कशी काम करते यंत्रणा? जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये!)
१. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि कौशल्य दोन्ही असते, त्या व्यक्तीसमोर नेहमीच काही ना काही मार्ग खुला असतो,
– डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
२. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः.
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः..
गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू, गुरूच शंकर.
गुरू हेच खरे परब्रह्म, त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
३. “एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो,
स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो.”
“गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरुराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
३. “शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही,
आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.”
– शिक्षक दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
४. “शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत,
ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात.”
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
५. शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ,
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक
सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !
६. आई गुरु आहे, बाबाही गुरु आहेत. विद्यालयातील शिक्षक गुरु आहेत.
आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरु आहेत.
शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम!
७. खरे शिक्षक ते असतात जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात. – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
८. जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला माहित आहे, तेव्हा आपण शिकणे थांबवतो. – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
९. पुस्तक हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण संस्कृतीमध्ये पूल बांधतो. – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
१०. शिक्षक हे देशातील सर्वोत्कृष्ट मन असले पाहिजेत. – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
हेही पहा –