तिरुवल्ला (Thiruvalla) हे भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यातील एक नयनरम्य शहर आहे. केवळ त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठीच नाही, तर पारंपरिक पाककृतींचा वारसा जतन करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. तिरुवल्लामध्ये विविध खाद्यपदार्थांचे प्रकार उपलब्ध आहेत. जे पर्यटक आणि खाद्यप्रेमींना आकर्षित करतात. तिखट, गोड अशा या चवदार पदार्थांचा आयुष्यात एकदा तरी आवर्जून नक्की आस्वाद घ्यावा, असे हे पदार्थ आहेत. पाहूया, तिरुवल्ला येथील वैशिष्ट्यपूर्ण नावे असलेल्या पदार्थांविषयी-
अप्पम :
अप्पा किंवा अप्पम हा पातळ पॅनकेक आहे. जो दक्षिण भारत आणि श्रीलंका येथील पारंपरिक पदार्थ आहे. आंबलेल्या तांदळाच्या पिठात आणि नारळाच्या दुधात हा पदार्थ तयार केला जातो. पारंपारिकपणे अप्पचट्टीमध्ये शिजवले जाते. हा केरळ आणि तमिळ पाककृतीचा एक भाग आहे.
पुट्टू आणि कडला करी :
नाश्त्याचा आणखी एक लोकप्रिय पर्याय म्हणून या पदार्थाकडे पाहिले जाते. पुट्टू हा किसलेले नारळ घालून बनवलेला दंडगोलाकार वाफवलेला तांदूळ केक आहे. हे सहसा कडला करी, सुगंधी मसाले, कांदे आणि टोमॅटोसह शिजवलेला जातो. मसालेदार आणि तिखट काळ्यांच्या करीसोबत तो सर्व्ह केला जातो.
(हेही वाचा – PM Narendra Modi: सॅम पित्रोदांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार, म्हणाले…)
करीमीन पोलिचाथु :
करीमीन पोलिचाथु रेसिपी ही केरळची खासियत आहे. केरळमधील अलप्पुझा या मूळ गावी करीमीन मासा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. याला ग्रीन क्रोमाइड किंवा पर्ल स्पॉट फिश असेही म्हणतात. ते मुख्यत्वे राज्यभर गोड्या पाण्याच्या आणि खाऱ्या पाण्याच्या तळाशी राहतात. करीमीन फिश रेसिपीने सीफूड ढाब्यांपासून तारांकित रेस्टॉरंट्सपर्यंत हा पदार्थ आढळतो.
थॅलसेरी बिर्याणी :
केरळमध्ये थॅलसेरी पाककृतीचा प्रभाव अनेक ठिकाणी आहे. थॅलसेरी बिर्याणी ही एक लोकप्रिय डिश आहे ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम चिकनच्या रसाळ तुकड्यांनी शिजवलेली, मसाल्यांचे मिश्रण, तळलेले कांदे, काजू आणि मनुका यांनी सजवलेली चिकन बिर्याणी.
उन्नी अप्पम :
उन्नी अप्पम, हा तांदूळ, गूळ, केळी, भाजलेले नारळाचे तुकडे, भाजलेले तीळ, तूप आणि वेलची पूड तेलात तळून बनवलेला लहान गोल नाश्ता आहे. केरळमधील हा एक लोकप्रिय नाश्ता आहे. मल्याळममध्ये उन्नी म्हणजे लहान आणि अप्पम म्हणजे तांदळाचा केक.
हेही पहा –