नाविन्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रणदीप हुड्डा याच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Veer Savarkar) चित्रपटाचा टिझर नुकताच प्रसिद्ध झाला. या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दाद दिली. तसेच आम्ही हा सिनेमा कधी प्रदर्शित होतोय याची आतुरतेने वाट पाहात आहोत, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. ‘@न्यूज २४’ या वृत्तवाहिनीवर मानक गुप्ताने ‘चायवाला इंटरव्ह्यू’ या कार्यक्रमात रणदीप हुड्डाची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याला वीर सावरकरांवर आधारित अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने वीर सावरकरांना माफीवीर म्हटल्याबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. रॅपिड फायर राउंडमध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्याने मार्मिक आणि चोख उत्तर दिले आहे.
वीर सावरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तर
यावेळी रॅपिड फायर राउंडमध्ये अभिनेता रणदीप हुड्डाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. वीर सावरकरांवर अन्याय झाला होता, असं वाटतं का? सावरकरांना देशद्रोही म्हणणं योग्य आहे का? त्यांना आतंकवादी म्हणणं योग्य आहे का? अशा स्वरुपाचे प्रश्न यावेळी विचारण्यात आले. या प्रश्नांना रणदीपने सडेतोड उत्तरे दिली.
माफीवीर म्हणणाऱ्यांवर व्यक्त केला संताप !
या प्रश्नोत्तराच्या फेरीत ‘वीर सावरकर यांना आतंकवादी म्हणणे योग्य आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना इंग्रजांच्या विरोधात ते आतंकवादीच होते, असे उत्तर रणदीपने दिले आहे, तसेच मुलाखतकार मानक गुप्ताने ‘वीर सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य आहे का? असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल?’ , असा प्रश्न विचारताच रणदीपने माफीवीर म्हणणाऱ्यांवर संताप व्यक्त करून ‘थप्पड मारीन. स्वातंत्र्यवीर सावरकर माफीवीर नव्हते,’ असे म्हटले. तसेच इंग्रज कोणत्या क्रांतिकारकाला जास्त घाबरत असत या प्रश्नाचे उत्तरही त्याने ‘वीर सावरकर’ असे दिले आहे.
माफीवीर कहने वालों पर खूब भड़के एक्टर रणदीप हुड्डा
◆ ‘चाय वाला इंटरव्यू’ में कांग्रेस पर भी बरसे
◆ वीर सावरकर पर Randeep Hooda ने बनाई है फ़िल्म #VeerSavarkar | #RandeepHooda | #Chaiwalainterview@manakgupta | @RandeepHooda pic.twitter.com/KlxtHyQODV
— News24 (@news24tvchannel) March 5, 2024
वीर सावरकर यांच्यावर आतापर्यंत सिनेमा का नाही?
काही पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही किंवा घाबरट का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर देताना रणदीप म्हणाला की, त्यांना घाबरट म्हणणारे स्वत:च घाबरट आहेत. वीर सावरकरांविषयीच्या सत्य बाबी कोणी दडवल्या? यावर आधी इंग्रजांनी त्यानंतर काँग्रेसने असे उत्तर रणदीप याने दिले आहे. ‘वीर सावरकर’ यांच्यावर आतापर्यंत कोणीच सिनेमा का केला नाही? या प्रश्नाचे अभिनेता रणदीपने ‘हेच मी विचारू इच्छितो की का नाही? असे का? ‘, असे कोणते क्रांतिकारक आहेत, जे स्वातंत्र्यासाठी लढले, ज्यांना सत्तेची हाव नव्हती? या प्रश्नाला रणदीप हुड्डाने ‘अनेक क्रांतिकारक आहेत, जे देशासाठी प्राणपणाने लढले आहेत, मात्र राजकारण्यांना श्रेय दिले जाते, हे प्रत्येक ठिकाणी घडते, असे म्हटले.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ बेस्ट सिनेमा !
हिंदुस्थानात राम मंदिर बांधायला वेळ लागला असे वाटते का? यावर रणदीपने ‘हो खरोखरच’ असे उत्तर दिले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोधी पक्षाने जायला हवे होते का? ‘हो नक्कीच जायला हवे होते.’ तसेच तुझा बेस्ट आणि फेव्हरेट सिनेमा कोणता या प्रश्नाचे उत्तर रणदीपने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे दिले.