Veer Savarkar Premiere Show: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटामुळे क्रांतिकारकांच्या स्मृतिंना उजाळा मिळेल – रणदीप हुड्डा

235
Veer Savarkar Premiere Show: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटामुळे क्रांतिकारकांच्या स्मृतिंना उजाळा मिळेल - रणदीप हुड्डा

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) या सिनेमाचा विशेष प्रीमियर शो (Veer Savarkar Premiere Show) रविवारी, (२४ मार्च) सनसिटी सिनेमा, (SunCity Cinemas) विलेपार्ले येथे भारत विकास परिषद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, वीर सावरकर  (Veer Savarkar)  यांची प्रगल्भ आणि प्रभावी व्यक्तिरेखा अभिनेता रणदीप हुड्डाने (Actor Randeep Hooda)  साकारली आहे. विशेष (special premiere)  म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले आहे.

आजच्या तरुण पिढीला वीर सावरकरांचा खरा इतिहास कळावा, देशासाठी त्यांना केलेला त्याग, संघर्ष याविषयी कळणे अत्यंत आवश्यक आहे. याच प्रेरणेने या चित्रपटाची निर्मिती केली असून यामुळे तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती वाढायला मदत होईल. वीर सावरकर कोण होते, त्यांनी आपले आयुष्य देशासेवेकरिता वाहिले, याविषयी देशभक्तांना माहिती मिळावी आणि जगभरात त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे, असे अभिनेता रणदीप हुड्डाने या चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान सांगितले.

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar : पुन्हा द्वेषाची पेरणी; स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाविषयी जाणीवपूर्वक पसरवली जात आहे नकारात्मकता)

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाच्या विशेष प्रीमिअर शोवेळी भारत विकास परिषदेतील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी भारत विकास परिषदेचे राज्य संयुक्त सचिव दिगंबर काळे, अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, सरचिटणीस संदीप पारीक, अर्थ सचिव प्रशांत गंगवाल, संयुक्त सचिव ललित छेडा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्यासह अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

क्रांतिकारकांच्या स्मृतिंना उजाळा
अभिनेता रणदीप हुड्डाची या प्रीमियर शोला विशेष उपस्थिती लाभली. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना रणदीप हुड्डाने चित्रपट साकारताना आलेला अनुभव, शारीरिक आणि मानसिक परिश्रम, चित्रपट प्रदर्शित करण्याचा अनुभव आणि अडथळ्यांवर केलेली मात याविषयी उपस्थितांना माहिती दिली. “देशातील विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतिंना उजाळा मिळावा, यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.’, असे विधान त्याने यावेळी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.