गुणांची आणि दुर्गुणांची पारख हवी

    151

    आपण सभ्य समाजात राहतो. आपण सुविद्य आणि सुसंस्कृत आहोत. आपण प्रसिद्ध नसलो तरी आपण आपला सुसंस्कृतपणा टाकायचा नाही. त्याचवेळी सदगुणांचा गौरव करायचा आणि दुर्गुणांवर टीका करायची हेच सुसंस्कृत आणि सुविद्यापणाचे लक्षण आहे. असे संस्कार पूर्वी आपल्यावर केले जात होते.‌

    आता काळ बदलत चालला आहे. संपूर्ण मानवी समाजात आचार विचारांच्या बाबतीत परिवर्तन झालेले आढळते. अपराध्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करून त्यांचे कोड कौतुक प्रकटपणे करण्याची कुप्रथा पडली आहे. खलनायकाला नायक म्हणून समाजासमोर आणण्याचा परिपाठ चालू आहे. निर्व्यसनी असणे हा अपराध ठरवला जातो. मद्यपानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. एकंदरीत समाजातल्या सर्व स्तरांवर दुर्गुणांचा भाव वधारला आहे. याचा प्रत्यय वारंवार येतो.

    तसाच प्रकार नुकताच घडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लव्ह आणि जिहाद माहित आहे पण लव्ह जिहाद माहित नाही असे म्हटले आहे. लव्ह जिहादचा प्रकार केवळ हिंदुस्थानात आढळत नसून जगभरात आढळतो आहे. आपल्या देशात तर गेली अनेक वर्षे लव्ह जिहाद चालू आहे.

    संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करण्याचा संकल्प मुस्लिम ब्रदरहुडने केला आहे. त्यासाठी जिहाद, छुपे युद्ध, लँड जिहाद, लव्ह जिहाद, अन्य धर्मीयांना इस्लाम धर्माची दीक्षा देणे असे अनेक प्रकार हाताळले जात आहेत.

    मुसलमान तरुण हिंदू नाव धारण करून किंवा मुसलमान नाव ठेवून हिंदू तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि फसवतात. त्यांचा अतोनात छळ करतात.‌ अखेरीस त्यांना मारून टाकतात. गेल्या काही काळात अशी शेकडो प्रकरणे आढळली आहेत. केरळच्या उच्च न्यायालयाने सुद्धा लव्ह जिहाद अस्तित्वात असल्याचे मान्य केले आहे. आफताब या मुस्लिम तरुणाने श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीचे अनेक तुकडे केल्याची घटना लव्ह जिहादचे ज्वलंत उदाहरण आहे.
    मुसलमान तरुणांना हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी प्रेमाचे संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी अर्थसाह्य करणारा जगातला मुसलमान समाज आहे. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही.

    या लव्ह जिहादच्या मागचा नेमका हेतू आपण लक्षात घेत नाही. म्हणजेच आपण त्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करत आहोत. या लव्ह जिहादचा आपल्या देशावर होणारा गंभीर परिणाम नेत्याने जाणला पाहिजे एवढी सामान्य अपेक्षा देशातल्या सामान्य जनतेची असते. पण सुप्रियाताई यांच्या विधानाने देशातले बहुसंख्य नेते याबाबतीत सहजग आहेत असे म्हणता येत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

    आपला देश लोकशाही प्रधान असलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात लोकसंख्येला म्हणजेच संख्याबळाला विशेष महत्त्व आहे. हिंदू तरुणीवर प्रेमाचे मायाजाल टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे आणि नंतर मारून टाकणे किंवा धर्मांतरित करून घेणे. हा एक मोठा कट आहे. हे षडयंत्र आहे. असे कुकृत्य केल्याचा कोणताही पश्चाताप मुसलमान तरुणांना झालेला आढळत नाही. हे क्रौर्यच षडयंत्र स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. क्रौर्य हा सद्गुण नसून तो दुर्गुण आहे
    अमानवीय तेचे ते लक्षण आहे. हे विसरता येत नाही. हिंदू समाजातील संख्या कमी व्हावी या हेतूनेच हे छुपे युद्ध सुरू आहे.

    सुप्रियाताई म्हणतात त्यांना जिहाद माहित आहे. याचा अर्थ त्यांना जिहादचा अर्थ माहित आहे. संपूर्ण जग इस्लाममय करणे हे ध्येय इस्लाम धर्माने त्यांच्या अनुयायांसमोर ठेवले आहे. त्यासाठी केलेली प्रत्येक कृती म्हणजे जिहाद. अशी जिहादची व्याख्या आहे. म्हणजे हिंदुस्तानचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी केलेली प्रत्येक कृती ही जिहादच आहे. हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हिंदूंची संख्या कमी करणे हा एक जिहादच आहे.

    गोवंशाच्या कळपात गाईंची संख्या अधिक असेल तर गोवंश वाढण्याची शक्यता असते. ही गोष्ट ध्यानात घेतली की लव्ह जिहाद काय आहे हे लगेच लक्षात येईल. सुज्ञ जणांना यापेक्षा अधिक सांगण्याची आवश्यकता नाही.

    हिंदूंची संख्या कमी करून मुसलमानांची संख्या वाढवणे आणि त्या संख्याबळाच्या जोरावर कोणत्याही प्रकारचे युद्ध न करता, रक्तपात न करता हिंदुस्तानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्याचा हा मोठा डाव आहे. म्हणूनच अशा लव्ह जिहादला विरोध करणे राष्ट्रीय कर्तव्य ठरते.‌

    लव्ह आणि जिहाद मला माहित आहे पण मला लव्ह जिहाद माहित नाही असे सुप्रिया ताईंनी केलेले विधान आणि मला धर्म माहित आहे पण धर्मानुसार वागण्याची मला इच्छा होत नाही, तशी माझी प्रवृत्ती नाही. अधर्म काय आहे तेही मी जाणतो पण तो सोडून द्यावा असे मला वाटत नाही. असे महाभारतातील दुर्योधनाने केलेले विधान यामध्ये साधर्म्य आहे.

    एखादी गोष्ट राष्ट्राच्या दृष्टीने अहितकारक आहे, हे माहित असून सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे याला आत्मघात म्हणतात. सुप्रिया ताईंनी केलेले विधान हे असेच आत्मघातकी आहे. दुर्गुणांचा उदो उदो करणारे आहे. म्हणूनच ते आक्षेपार्ह आहे.

    व्याख्याते आणि लेखक
    ९८३३१०६८१२

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.