मुंबईत सापडलेल्या युरेनियममागील गौडबंगाल काय?

देशाच्या सुरक्षितेचा विचार केला तर युरेनियम हे भारतात आले कसे, याचा शोध घेतला पाहिजे, तसेच हे युरेनियम आणण्यामागे कुठल्या देशाचा सहभाग आहे का, याची कसून चौकशी झाली पाहिजे.

मुंबई दशतवाद विरोधी पथकाने  काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील मानखुर्द येथून ७ किलो युरेनियमसह दोन मित्रांना अटक करण्यात आली होती. मुंबईत युरेनियम मिळणे ते देखील भंगारात हि देशासाठी चिंतेची बाब आहे. युरेनियम विकता येत नाही आणि ते सहज विकत घेता देखील येत नसल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत युरेनियमचा साठा मिळणे ही गंभीर बाब आहे. मुंबईत मिळालेल्या युरेनियमच्या साठ्यामुळे पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांच्या पोटात गोळा आला आहे. मुंबईत मिळालेल्या युरेनियमच्या साठ्यामुळे पाकिस्तानने भीती व्यक्त करताच चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी पाकिस्तानची री ओढत मुंबईत मिळालेल्या युरेनियम प्रकरणी भारत सरकारने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे हू चुनयिंग यांनी म्हटले आहे.

तपास एनआयएकडे!  

मुंबईत मिळालेल्या युरेनियमबाबत भारत सरकार गंभीर असून केंद्राच्या गृहविभागाने राज्य एटीएसकडे असलेला युरेनियमचा तपास तात्काळ केंद्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ कडे सोपवला आहे. युरेनियम प्रकरणात अटक करण्यात आलेले जिगर पंड्या आणि अबू ताहीर चौधरी हे दोघे मुंबईतील तरुण असून दोघे उच्च शिक्षित आहे. जिगर पंड्या एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता, तर अबू ताहीर याच्या वडिलांचा मानखुर्द येथे भंगाराचा व्यवसाय आहे. ६ वर्षांपूर्वीच युरेनियम भंगारात आले होते व काहीतरी वेगळे असल्यामुळे आम्ही ते वेगळे करून एका कपाटात ठेवून दिले होते, अशी माहिती साबू ताहिरने तपास यंत्रणेला दिली होती. मात्र आबू ताहीर देत असलेली माहिती किती खरी आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

(हेही वाचा : धक्कादायक! ७ किलो युरेनियम जप्त!)

जप्त केलेले युरेनियम विध्वंसक!

भंगारात आलेले युरेनियम हे तपासणीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्र येथे पाठवण्यात आले होते, भाभा अणू संशोधन केंद्र येथून आलेल्या अहवालात हे नैसर्गिक युरेनियम असून अतिशय धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले होते. हे  युरेनियम किरणोत्सर्ग सोडणार असून मानवी जिवितास हानिकारक असल्याचे अहवालात म्हटले होते. या अहवालानंतर ऍटोमिक एनर्जी कायदा १९६२ कायद्यातील तरतुदींनुसार प्रादेशिक संचालक दक्षिण विभाग, ऍटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्प्लोरेशन अँड रिसर्च ऍटोमिक एनर्जी विभाग, सिव्हिल लाईन नागपूर यांच्या फिर्यादीवरून शासनाने प्रतिबंधित पदार्थ म्हणून निर्देशित केलेले नैसर्गिक युरेनियम कब्जात बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कलाम २४(१) ऍटोमिक एनर्जी कायदा १९६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…तर देशाचे समुद्रतट असुरक्षित ठरतात!

युरेनियम हा खनिज पदार्थ असून त्याचा उपयोग अणुबॉम्बसाठी होतो, ७ किलो युरेनियच्या किरणोत्सर्गमुळॆ अर्धे शहर नष्ट होऊ शकते, अशी माहिती काही जाणकारांनी दिली आहे, तसेच त्याच्या म्हणण्यानुसार युरेनियमचा वापर भारतात भाभा अणूशक्ती केंद्रात केला जात असला तरी त्याची विक्री-खरेदी सामान्य व्यक्ती करूच शकत नाही. हे नैसर्गिक युरेनियम भारतात मिळत नसून ते परदेशातून मागवण्यात येते. आपल्या देशात समुद्र मार्गातून अनेक प्रकारच्या तस्करी होत असतात, हे मुंबईत दाखल झालेले हे युरेनियम त्याच मार्गाने भांगातून आले असेल, तर आपल्या देशाचे समुद्रतट असुरक्षित असल्याचे मत जाणकारांनी मांडले आहे. देशाच्या सुरक्षितेचा विचार केला तर युरेनियम हे भारतात आले कसे, याचा शोध घेतला पाहिजे, तसेच हे युरेनियम आणण्यामागे कुठल्या देशाचा सहभाग आहे का, याची कसून चौकशी झाली पाहिजे, असे मत एका निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचा :युरेनियम प्रकरणाचा तपास एनआयएकडे… नव्याने दाखल केला गुन्हा)

चीनने तयार केले युरेनियम!

पहिल्यांदाच चीनने असे युरेनियम तयार केले आहे, जे जगासाठी नवीन आणि अत्यंत दुर्मिळ आहे. हे युरेनियम हा आतापर्यंतचा सर्वात हलका अणु स्रोत आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी हे काम जगापासून छुप्या पद्धतीने केले आहे. तसेच तो हे युरेनियम कसे वापरणार हेही समोर आले नाही. युरेनियम -214 असे या युरेनियमचे नाव आहे. तर नैसर्गिकरित्या आढळलेल्या युरेनियमला युरेनियम -238 म्हणतात. नैसर्गिकरित्या, युरेनियम -238 च्या 99 टक्केमध्ये 146 न्यूट्रॉन असतात, तर चीनने तयार केलेल्या युरेनियम -214 मध्ये केवळ 122 न्यूट्रॉन असतात. कोणत्याही घटकातील समस्थानिकांमध्ये समान प्रोटॉन असतात. युरेनियमच्या बाबतीत हे 92 फिक्स आहेत. पण न्यूट्रॉनची संख्या बदलते. त्यांच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येच्या आधारे युरेनियमचे आयसोटोप्स नावे देण्यात आले आहेत. चिनियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे वैज्ञानिक झुआन झांग आणि त्यांच्या टीमने एक नवीन आणि दुर्मिळ युरेनियम -214 तयार केले आहे. ते बनवण्यासाठी झियुआन झांगने टंगस्टनच्या नमुन्यावर स्फोट केला. त्याच्यावर अर्गोन आणि कॅल्शियम बीम शिल्लक होते. जेव्हा त्यांचे दोन्ही अणू एकत्रित झाले तेव्हा त्यांनी त्यात युरेनियम -214 कण ठेवले. यानंतर, ते मॅग्नेटिज्ड डिव्हाइसमध्ये घातले गेले, ज्याला विभाजक म्हणतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here