बॉय स्काउट्स चळवळ उभारणाऱ्या लॉर्ड रॉबर्ट बॅडेन-पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त २२ फेब्रुवारी रोजी जागतिक स्काउट दिन (World Scout Day) साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील स्काउट आणि गाईड एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. शालेय विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रमांचे नियोजन केले जाते, जेणेकरून स्काऊटबद्दाल जागरुकता निर्माण होईल.
बॅडेन-पॉवेल यांनी १९०७ मध्ये बॉय स्काउट चळवळीची स्थापना केली. पुढे या चळवळीचा विस्तार झाला आणि युनायटेड किंगडममधील १७२ देशांतील ५७ दशलक्ष मुलं यामध्ये सहभागी झाले. या दिवशी ’जागतिक विचार दिन’ देखील साजरा केला जातो. गर्ल स्काउट आणि गर्ल गाईड संस्थांसाठी निधी उभारण्याचे काम यामिनित्ताने केले जाते.
आंतरराष्ट्रीय स्काउट दिन 2024 (World Scout Day 2024) ची थीम “स्काउट्स फॉर अ बेटर वर्ल्ड” अशी आहे. याचा अर्थ स्काउट्सच्या माध्यमातून एक चांगले जग निर्माण करणे होय~. स्काउट्स म्हणजे स्वयंसेवक. ते लोकांना मदत करतात. सेवाकार्यात सक्रियपणे सहभागी होतात. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी समाजात झटतात.
(हेही वाचा – Onion Export : कांदा निर्यात बंदीवरून सर्व संघटना एकत्र, होणार मोठे आंदोलन )
या दिवशी जगभरातील स्काउट्स आणि गाईड्स एकत्र येतात आणि विविध उपक्रम राबवतात. शारिरीक खेळ, हायकिंग, स्विमिंग इत्यादीद्वारे आरोग्य चांगले राखणे हे देखील महत्वाचे ध्येय असते. कारण समाजात जाऊन सेवा करायची असेल तर स्वास्थ्य उत्तम हवे. आपल्याकडे देखील अशी स्काउट्स चळवळ उभारली गेली होती, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या चळवळीचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…
आज संघ ही जगभरात पसरलेली सर्वात जुनी आणि मोठी संघटना आहे. देशहितासह वसुधैव कुटुंबकम हे मोठे ध्येय ठेवून संघ कार्य करीत आहे. त्यामुळे जागतिक स्काउट्स दिन साजर असताना आपल्या देशातील संघटनेचा विसर पडता कामा नये.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community