Cyber Crime: App च्या मदतीने व्यावसायिकाची ३ कोटींची फसवणूक

128
राज्यसह मुंबईत सायबर गुन्हेगारीमध्ये (Cyber ​​criminals in Mumbai) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये डिजिटल पेमेंटच्या (Digital Payments) माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेची फसगत होत आहे. अशीच एक घटना मुंबई उपनगरातील मीरारोड (Mira Road crime case) येथे झाली आहे. यामध्ये शेअर मार्केटमध्ये (share market) गुंतवणूक करायला लावून ९ कोटींचा फायदा दाखवत तो फायदा मिळविण्यासाठी आणखी पैसे उकळून सायबर लुटारूंनी एका व्यावसायिकाची तब्बल ३ कोटी १२ लाख ८१ हजार रुपयांना फसवणूक केली. ऑनलाइन माध्यमातून झालेल्या गुन्ह्यांपैकी आतापर्यंतची ही सर्वांत मोठी फसवणूक आहे. (Cyber Crime)
मीरा रोडच्या जीसीसी क्लबजवळ हबटाऊन गार्डेनिया भागात राहणारे व्यावसायिक नीलेश नरेंद्र कोतनीस (Nilesh Narendra Kotnis) (वय ५०) यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भातील एका नामांकित बँकेचे नाव वापरून बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नोव्हेंबरमध्ये अॅड केले होते. त्या ग्रुपमध्ये संबंधितांच्या सांगण्यानुसार गुंतवणूक केल्यावर भरपूर फायदा होत असल्याचे आमिष दाखविले.
मिळलेल्या माहितीनुसार, कोतनीस यांना नामांकित बँकच्या नावाने असलेले मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यात पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यांनी बँक खात्यातून ऑनलाइन पैसे गुंतविण्यास (Investing money online) सुरुवात केली. त्यांना त्या अॅपमध्ये ९ कोटी रुपयांपर्यंतचा फायदा झाल्याचे दाखविण्यात आले.
(हेही वाचा – Deonar Waste-Energy Plant : कचऱ्यापासून प्रतिदिन ७ मेगावॉट वीजनिर्मिती; ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकल्प होणार कार्यान्वित)
झालेला फायदा काढून घेण्यासाठी कोतनीस यांच्याकडे शुल्क म्हणून आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरले. परंतु, मुद्दल आणि दाखवला जात असलेला फायदा मात्र त्यांना काढता येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी काशिगाव पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिल्यावर पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी या गुन्ह्यातील ५ मोबाइल क्रमांकधारक तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपशी (fraud WhatsApp group) संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पुजारी हे अधिक तपास करीत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.