Budget 2023: निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केलेलं ‘श्रीअन्न’ म्हणजे काय?

207

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी मोदी सरकारच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात श्रीअन्नचा (मिलेट्स) उल्लेख सीतारामाण यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान जाहीर केले. मिलेट्स म्हणजेच भरडधान्य हे संपूर्ण पोषक आहार आहे. त्यामुळे भारतात श्रीअन्न सुद्धा म्हटले जाते, असे सीतारामण यांनी स्पष्ट केले. पण श्रीअन्नामध्ये कोणत्या धान्यांचा समावेश असतो आणि त्याचे शरीराला फायदा काय? जाणून घ्या

ज्या धान्यांवर नैसर्गिकरित्या आवरण असते. मग ते भरड करून आहारात समावेश केले जाते, त्याला भरडधान्य म्हणजेच श्रीअन्न म्हणतात. पूर्वीच्या काळात धान्यांवरील साळ काढण्यासाठी उखळ-मसुळ आणि दगडी जात्याच्या वापर केला जायचा. पण आता जात्याची जागा पिठाण्या गिरण्याची घेतली आहे.

श्रीअन्नमध्ये कोणते धान्य येते?

ज्वारी
बाजरी
राळे
वरई
नाचणी
कोदो
राजगिरा
डेंगळी

श्रीअन्नाचे फायदे

श्रीअन्नामध्ये ग्लूटेन शून्य टक्के असतो. ग्लुटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटिनचा एका भाग आहे. या घटनामुळे अपचन आणि अॅलर्जी होते. तसेच शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणून श्रीअन्नात ग्लूटेन नसल्यामुळे याचे शरिराला अनेक फायदे असतात. भरडधान्यांतील घटकांमुळे मधुमेह, रक्तक्षय रोखण्यास मदत होते.

(हेही वाचा – Budget 2023: सिगारेट महागल्यानंतर ITCचे शेअर्स घसरले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.