अर्थमंत्री निर्मला सीतारामण या मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष मोदी सरकारच्या बजेटकडे लागले आहे.
( हेही वाचा : Union Budget 2023: काय स्वस्त काय महाग?; जाणून घ्या एका क्लिकवर)
७ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट
सध्या ज्यांचे उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे ते आयकर भरत नाहीत परंतु आता ७ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट देण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. मध्यमवर्गीयांसाठी ही सर्वात मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे. ही लिमिट न्यू टॅक्स रेजिम अंतर्गत लागू करण्यात आली आहे.
नवीन कर उत्पन्न मर्यादा किती?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
नव्या टॅक्स प्लॅननुसार
- ३ लाखांपर्यत कोणताही कर नाही
- ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के कर
- ६ ते ९ लाखांसाठी १० टक्के कर
- ९ ते १२ लाखांसाठी १५ टक्के कर
- १२ ते १५ लाखांसाठी २५ टक्के कर
- नव्या टॅक्स प्लॅननुसार १५ लाखांसाठी ३० टक्के कर