केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प २०२३-२४ सादर केला. ज्यामध्ये रेल्वे अर्थसंकल्पही सामील होता. केंद्र सरकारने पुन्हा एकदा रेल्वे अर्थसंकल्पात वाढ केली आहे. रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केल्याचे निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले आहे. अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या की, ‘आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे. वर्ष २०१३-१४च्या तुलनेते रेल्वेचा यंदाचा अर्थसंकल्प जवळपास ९ पटीने अधिक आहे.’
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, ‘रेल्वेमध्ये १०० नवीन योजनांची सुरुवात होणार आहे. याशिवाय नवीन योजनांसाठी ७५ हजार कोटींचा निधी दिला गेला आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीने १०० योजना शोधण्यात आल्या आहेत. ज्यावर पुढील काम केले जाईल.’
गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्प काय होते?
गतवर्षी केंद्र सरकारकडून रेल्वेसाठी एकूण १ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली होती. गेल्यावर्षीही रेल्वेच्या अर्थसंकल्पात सरकारने वाढ केली होती. २० हजार कोटींहून अधिक वाढ केली होती. त्यावेळी अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या होत्या की, पुढील ३ वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ४०० वंदे भारत निर्माण केल्या जातील.
तसेच गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी रेल्वे योजना २०३०ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत रेल्वेच्या विकासाचा प्लॅन तयार केला आहे. यामध्ये रेल्वे सुविधांना नवे स्वरुप देण्याची घोषणा केली होती. यासाठी केंद्राने १ लाख कोटी निधीची गुंतवूक करण्याचे जाहीर केले होते.
(हेही वाचा – Budget 2023: अर्थसंकल्पाच्या सुरुवातीचे १० महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणा)
Join Our WhatsApp Community