Budget 2023 : गरिबांना वर्षभर मिळणार मोफत अन्नधान्य! अर्थमंत्र्यांची घोषणा

173

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कोरोना काळात आर्थिक चक्र बिघडल्यामुळे लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांना पगारकपात सहन करावी लागली. या कालावधीमध्ये सरकारने मोफत अन्नधान्य योजना सुरू केली. यामुळे गरिबांना महिन्याला मोफत अन्नधान्य मिळाले. यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ही अन्न योजना पुढील वर्षभर सुरू ठेवण्यात येणार आहे.

( हेही वाचा : Railway Budget 2023: रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद; २०१९च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात ९ पटीने वाढ)

मोफत अन्नधान्याची घोषणा

गरीब वर्गासाठी पुढील एका वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व अंत्योदय आणि गरीब कुटुंबांना एक वर्षासाठी मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी सुमारे २ लाख कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उचलण्यात येणार आहे.

दरम्यान यावेळी कृषी क्षेत्रासाठी धान्य भांडार क्षमता वाढवली जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. पीक हंगामात पिकांच्या किमती झपाट्याने घसरतात. त्यामुळे साठवणुकीत्या अधिक सुविधांमुळे शेतकऱ्यांना मंडईत धान्य पोहोचवण्यास मदत होईल आणि त्यांचा अधिक नफा होईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.