Budget 2023 Updates: पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; अर्थमंत्र्यांची घोषणा

119

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा  अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; अर्थमंत्र्यांची घोषणा

डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत डिजीलाॅकरचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे. याशिवाय सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून ओळखले जाईल.

( हेही वाचा: अर्थसंकल्पापूर्वी Google वर सर्च होत आहेत या 5 गोष्टी; जाणून घ्या सविस्तर )

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

  • शेतक-यांना शेती करण्यासाठी केंद्र सरकार विशेष निधी
  • कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवा
  • कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना
  • मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज योजना
  • अन्न साठवण विकेंद्रीकरण केंद्र
  • गरीब जनतेला १ वर्ष मोफत धान्य देणार
  • ३८ हजार ८०० शिक्षकांच्या नियुक्त्या करणार
  • ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाणार
  • कृषीपूरक स्टार्टअप्सना विशेष मदत करणार
  • देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार
  • कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार
  • डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार
  • हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान जाहीर
  • मत्स्य विकासासाठी ५ हजार कोटींची तरतूद
  • छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मातीला प्रोत्साहन दिले जाणार
  • ५० नवीन विमातळं उभारणार
  • रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.