लडाखसोबतच अरुणाचल प्रदेशातही चीनसोबतच्या सीमेचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. याचबरोबर पाकिस्तान काश्मीरमध्ये नापाक कारवाया करत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन, बुधवारी देशाच्या संरक्षण बजेटमध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याअंतर्गत संरक्षण मंत्रालयाच्या वतीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारने नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि आत्ननिर्भर भारत यावर मोठा भर दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीमेवर चीनसोबत तणावाचे वातावरण असतानाच सरकारने संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात ही वाढ केली आहे.
( हेही वाचा: देशात नवीन 157 नर्सिंग महाविद्यालये सुरु होणार; जाणून घ्या आरोग्य क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा )
संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवणार
मागच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 5.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु ती आता 13 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे, जी 5.94 लाख कोटी रुपये आहे. ही रक्कम एकूण बजेटच्या 8 टक्के आहे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बजेटचा मोठा भाग सैनिकांच्या पगार आणि पेन्शनवर खर्च होत असला तरी त्यामुळे लष्कराला हायटेक करण्यावरही भर दिला जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात यंदाही देशाला स्वावलंबी बनवण्यावर सरकारचा भर आहे.
Join Our WhatsApp Community