अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वर्ष २०२३ चा अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये नवीन कर प्रणालीवर विशेष जोर दिला. त्यानुसार ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. ७ लाख उत्पन्न असलेल्या करदात्याच्या उत्पन्नातील ३ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही. उर्वरित ४ लाखाच्या उत्पन्नावर ३ लाखापर्यंत ५ टक्के कर लागणार आणि पुढील १ लाखाच्या उत्पन्नावर १० टक्के कर लागणार. ज्याची एकूण कर रक्कम २५ हजार रुपये होते. परंतु 87A अंतर्गत तुम्हाला २५ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे ७ लाख रुपयांपर्यंतचे कर उत्पन्न करमुक्त होईल. 87A वैयक्तिक करदात्याला कर लाभ प्रदान करते, जर त्याचे एकूण करपात्र उत्पन्न रु. ७ लाखाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसेल.
नवीन कर प्रणाली
- 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नसेल
- 3 ते 6 लाखांपर्यंतचे उत्पन्न – 5% कर
- 6 लाख ते 9 लाखांपर्यंतचे उत्पन्न – 10% कर
- 9 लाख ते 12 लाखवर -15 % कर
- 12 लाख ते 15 लाखावर – 20% कर
- 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर
(हेही वाचा अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात गुरुवारी अर्थसंकल्प विश्लेषण)
Join Our WhatsApp Community