संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प २०२३-२४ बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. अनेक मोठ-मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अचानक असं काही निर्मला सीतारामण बोलल्या, ज्यामुळे गंभीर सभागृहातील खासदारांना हसण्यास भाग पाडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनाही हसू अनावर झालं.
नक्की काय घडलं?
अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जेव्हा जुन्या झालेल्या वाहन बदलाबाबत बोलत होत्या तेव्हा चुकून जुनी राजकीय व्यवस्था बदलण्याबाबतचं भाष्य त्यांच्या तोंडून निघालं. ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीनं माफी मागितली. राजकीय व्यवस्था बदलण्याबाबत ऐकून सर्व खासदार हसू लागले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या होत्या की, वाहन बदली धोरण, जुनी वाहनं बदला करण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण नीति आहे. जे जुने राजकीय…..ओह्ह सॉरी. जे जुने प्रदुषित वाहनांची बदली करण्यासाठी काम करेल. हे धोरण भारताच्या हरित धोरणाला प्रोत्साहन देईल.
सीतारामण यांच्या या चुकीवर पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्र्यांसह सुप्रिया सुळे, डिंपल यादव आणि सर्व खासदारांना हसू अनावर झाले.
(हेही वाचा – Railway Budget 2023: रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद; २०१४च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात ९ पटीने वाढ)
Join Our WhatsApp Community