बॉलिवूड चित्रपट शुक्रवारीच का होतात प्रदर्शित ?

267
बॉलिवूड चित्रपट

दरवर्षी २० हून अधिक भाषांमधून १५०० – २००० चित्रपट निर्माण करणारी बलाढ्य इंडस्ट्री म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टी. भारतीय चित्रपटांना लॉकडाऊनच्या एक – दोन वर्षांच्या काळात झटका बसला होता. तरीही आता संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री सुरळीत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

( हेही वाचा : Petrol And Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल; लवकरच देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार परिणाम)

बॉलिवूड चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात?

  • बहुतांश बॉलिवूड चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात. नेमक्या त्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्यामागे काही कारणे आहेत.शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. त्यामुळे जर या दिवशी  प्रदर्शित झाला तर निर्मात्याला चांगला फायदा होईल, असे मानले जाते.
  • शनिवार रविवारच्या लॉंग वीक एन्डची सुरूवात शुक्रवारी होते. बहुतांश लोकांसाठी शुक्रवार हा शेवटचा वर्किंग दिवस असतो. त्यामुळे अनेक लोक शुक्रवारी संध्याकाळी मित्रमंडळींसह चित्रपट पहायला जातात.
  • शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या प्रथेची सुरूवात १९४० च्या सुमारास हॉलिवूडमध्ये झाली. अमेरिकेत त्यावेळी “गॉन विथ द वाईंड” हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला होता.
  • भारतात १९६० च्या आधी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निश्चित दिवस नव्हता. यादरम्यान ५ ऑगस्ट १९६० ला मुघल-ए-आझम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतातच नाही तर संपूर्ण जगात घवघवीत यश मिळवले होते. त्या चित्रपटासारखे यश मिळवण्याची इच्छा प्रत्येक निर्मात्याला आहे. त्यामुळे त्या चित्रपटाच्या पावलावर पाऊल टाकत इतरांनी सुद्धा त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करायला सुरूवात केली.

बॉलिवूड

हेही वाचा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.