मागच्या काही महिन्यांपासून व्हाॅट्सपअॅपने लाखो अकाऊंट्सवर बंदी घालत आहे. फेब्रुवारी महिन्यात व्हाॅट्सअॅपने अनेक अकाऊंट्स बंद केली आहेत. METAच्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफाॅर्मने फेब्रुवारी 2022 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान, 10 लाखांहून अधिक व्हाॅट्सअॅप अकाऊंट्स बंद केली आहेत. व्हाॅट्सअॅपवरुन हानिकारक कृत्य केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये खोट्या बातम्या पसरवणे किंवा इतरांना त्रास देणे या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर व्हाॅट्सअॅपवरुन अशा गोष्टी करत असाल, तर सावधान तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते.
म्हणून उचलली जाताहेत पावले
व्हाॅट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सायन्टिस्ट आणि तज्ञांमध्ये कंपनी सातत्याने गुंतवणूक करत आहे. ते व्हाॅट्सअॅपच्या युझर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलत आहेत. भारतातील आयटी नियम 2021चे पालन करुन त्यांनी 9 व्या महिन्याचा अहवाल सादर केला आहे. यूजर सेफ्टी रिपोर्टमध्ये यूजर्सच्या तक्रारी आणि त्यावर व्हाॅट्सअॅपने केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा :महागाई पाठ सोडेना! आता लिंबाने टाकले पेट्रोलला मागे )
टेक्नाॅलाॅजीचा होतोय वापर
फेब्रुवारी महिन्यात 1.4 दशलक्ष अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत. कंपनीने पुन्हा सांगितले की, व्हाॅट्सअॅपवरील सर्व संदेश हे एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. याचा अर्थ मेसेज पाठवणारा आणि रिसिव्हर यांच्याशिवाय इतर कोणताही तृतीय पक्ष मेसेज वाचू शकत नाही. कंपनी देखील तो संदेश वाचू शकत नाही.
Join Our WhatsApp Community