नवरदेवाचे उखाणे म्हटले की ते मराठीतच (Ukhane in Marathi for Male) असायला हवे. असेच काही मराठी उखाणे नवरदेवाचे खास करून तुमच्यासाठी मांडले आहेत.
- १. पुरणपोळीत तूप असावे साजूक, ….आहेत आमच्या नाजूक
- २. काही शब्द येतात ओठातून,….चं नाव मात्र येतं हृदयातून
- ३. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास….ला भरवितो श्रीखंडाचा घास
- ४. सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे…..अनुरूप
- ५. संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका….चं नाव घेतो सर्वांनी ऐका
- ६. दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
- ७. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा
- ८. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री
- ९. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
- १०. सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात
Join Our WhatsApp Community